Thursday, 28 June 2018

कळसुबाई ट्रेक २४ जून २०१८.


कळसुबाई ट्रेक २४ जून २०१८.

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई..... फक्त ८००रुपयात करून दाखवलं..........  ६६ तरुण-तरुणी............. तमिळ अभिनेत्री श्रुष्टी डांगे...... ८ वर्षाचा आदित्य..... आणि त्यावर कहर अवघ्या ४ वर्षाचा तन्मय...... धीरज ने यावेळी मोठी मदत, गावात ३ दिवसापासून light नव्हती....... श्रावणातल्या पावसासारखा रिमझिम पाऊस...... आदित्य, शरीराने जरी गोल असला तरी चढायला पोरग कट्टर होत......उतरताना पायाला आलेली वात..फर्जंद आकाश ने त्याला खांद्यावर घेऊन उतरलेला निम्मा गड....  उतरताना तर खाली पावसाने चिक्कुल केला होता........ गरीबाच्या घरी जेवण केल तर आपल्या पोटामुळ त्यांच्या पोटाला आपला हातभार लागेल हीच आपली इच्छा.

 
भारतातील सर्वोच्च शिखर म्हणजे के२ आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई. या ट्रेक ला कोणालाही मस्का मारायचा नाही हे ठरलं होत, आणि तरीही ६६ तरुण-तरुणी, २ किशोर वयीन आणि, ८ वर्षाचा आदित्य, आणि अवघ्या ४ वर्षाचा तन्मय यापासून सुरवात झाली होती. ऐनवेळी आधल्या दिवशीच ठरवलेली गाडी cancel झाली. ट्रेक ला निघण्याआधीच dsp ला कुत्र चावल, १२ ला येणारी बस १ ला आली. अशी विघ्न येत असतानाच ७० जणांनी ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. कळसुबाई चा ट्रेक म्हणजे कोणतीही commercial संघटना १५०० च्या खाली पैसे घेत नाही, पण रणझुंजार ट्रेकर्स ने फक्त ८००रुपयात करून दाखवलं. कारण यामागे एकच तळमळ होती कि आपला सह्याद्री, आपले किल्ले, आपली माणस त्यापासून तुटत आहेत, त्यांना पुन्हा एकदा सह्याद्रीच्या आणि इतिहासाच्या पानाना जोडणे.

 

 ७० जणांना handel करण म्हणजे तोंडची गोष्ट नव्हती. प्रत्येकाची वेगवेगळी तऱ्हा. धीरज ने यावेळी मोठी मदत केली, त्याच्याकड first-aid-kit पासून सफरचंद, पाण्याचे जार, buiscut, अशी सर्व सोय केली. धीरज म्हणजे complete package आहे. one man आर्मी. जीवनात तो काही बनो किवा न बनो पण माणूस म्हणून great च राहणार. धीरज सोबत सावलीसारखा महेश शब्द पडू देत नसतो. सोबतीला धनंजय (लग्न होऊन सुद्धा..आणि एक पोरग झाल तरी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस..तस खर श्रेय वाहिनीलाच द्यायला पहिजे.) म्हणजे कधीच नाही म्हणणार नाही असा. dsp च्या डोक्यातल्या नवीन कल्पना आणि लहान वयात कमवलेली चांगली दृष्टी (आईच्या दृष्टीत अजूनही बालिश असूनही)..भविष्यातली नेतृत्वाची चुणूक दाखवते. निकेश म्हणजे निर्विकार देवासारखा... कितीही वाईट परीस्थिती असली तरी हसून सामोरा जाणारा, (तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा असतोच म्हणा) माझी अर्धी काळजी निकेश असली कि संपते. आणि आमचा ..ह.भ.प. प्रसाद, भल्याभल्यांना वाकयुध्यात हरवणार character. कळसुबाई उतरताना पायाला आलेली वात मग फर्जंद आकाश ने त्याला खांद्यावर घेऊन उतरलेला निम्मा गड..आता सर्वांचच इथ लिहण सोयीस्कर नाही.. कारण हा ट्रेकिंग चा blog आहे. पण वरील सर्वांनी या ट्रेक मध्ये सावलीसारखी साथ दिली. म्हणून सर्वात आधी त्यांचे आभार.  


 

आमच्या दोन्ही गाड्या हळूहळू आणि खूप लांबच्या पल्ल्याने बारी गावात पोहचल्या. गावात ३ दिवसापासून light नव्हती. पाऊस पडला कि अस नित्यनियमाने होतंच. त्यांचे कष्ट फार मोठे आहेत. आपल्याला ५ मिनिट light नसली कि कस तरी होत. थोड्या वेळात फ्रेश होऊन चहा, नाश्ता करून कळसुबाई कड निघालो. शेतातून जाणारी वाट लगेच सिमेंट च्या पायऱ्यापर्यंत पोहचवते. पायऱ्या चढल्या कि थोड सपाट पठार मग पुन्हा छोटा चढ मग आपण मिनी कळसुबाई ला पोहचतो. ज्यांना कळसुबाई पूर्ण करता येन शक्य नसत त्यांनी इथूनच प्रती-कळसुबाईच दर्शन घेऊन माघारी निघावं. प्रत्येक ५/१० मिनिटानंतर हॉटेल ची जंत्री होतीच. सकाळी ९:३० ला निघालेली आमची टीम १:३० वाजता top वर होतो. सुरवातीला पाऊस नव्हताच. पण हळू हळू शिडकावा चालू झाला मग पुन्हा उतरेपर्यंत पावसाने साथ सोडली नाही. श्रावणातल्या पावसासारखा रिमझिम पाऊस. सुखद.... एकूण ४ शिड्या लागतात, पहिल्यांदा येणाऱ्याला स्वर्गाचा रस्ता सुद्धा त्यात दिसतोच दिसतो. तरीही आदित्य (८ वर्षाच प्वार) न थकता एका दमात चढत होत.( शरीराने जरी गोल असला तरी चढायला पोरग कट्टर होत). आदित्य कळसुबाई वरून उतरत असताना वर जाणार्या प्रत्येकाला प्रोत्साहन देत होता.( तुझ्यापेक्षा बारका असून पण चढलो मी..थोड राहीलय ..... अस करत चिडवत होता.) (धीरज चा मामे भाऊ असल्याने त्याचे सगळेच चाबरे गुण घेतले होते..आणि त्यात खुळेवाडीत राहणारा..मग तर नादच करायचा नाही). वर पोहचल्यावर अशी हवा सुटली होती कि सांगायलाच नको. (जाऊदे सांगतच नाही!) ताशी १२० चा स्पीड! एका कोपर्यावर तर २०० चा स्पीड क्रॉस केला असेल. ४ वर्षाचा तन्मय जिद्दीने चढ चढत होता. त्याचे आई-बाबा थकले पण तो काही थकेना, शेवटी पावसाच्या नावाखाली त्याला अर्ध्यावरच थांबायला  लागल.

कळसुबाई उतरताना शुभमच्या ( वयाने लहान असताना सुद्धा मोठे फोटोग्राफर म्हणून नाव कमावलेले) पायाला आली वात....(.मग पेटवायची का वात पासून ते कुठ काडी लावू असे जोक्स मारत पण सोबतच मदत करत) सर्व खाली उतरलो. मग फर्जंद आकाश ने त्याला खांद्यावर घेऊन उतरलेला निम्मा गड, त्यानंतर dsp ने त्याला साथ दिली.  तिथ थांबायला daring लागत. उतरताना तर खाली पावसाने चिक्कुल केला होता. १०/२० जन तर माझ्या नजरेत धपकन घसरून पडले असतील... या पडण्याची पण एक मज्जा असते.. हसायला येत फक्त..कारण पडल तर लागत नसत.. बरोबर वाट करत तो आपोआप खाली पडलेला असतो. अस पडत झडत आम्ही ४ वाजता खाली पोहचलो आणि तिथच माणिक (९११२८३०२१२) नावाच्या एका गरीबाच्या घरी order दिल्याप्रमाणे पोटभर जेवलो. हॉटेल पेक्षा अस गावातच गरीबाच्या घरी जेवण केल तर आपल्या पोटामुळ त्यांच्या पोटाला आपला हातभार लागेल हीच आपली इच्छा.

 

ट्रेक मध्ये तमिळ अभिनेत्री श्रुष्टी डांगे (आपल्या राकेश ची सख्खी मावस बहिण) या देखील सोबत होत्या. तमिळ जगात त्यांचे खूप fan आहेत. त्यांना जास्त त्रास मुद्दामच दिला नाही कारण celebraty ला celebrity म्हणून नुसत्याच सेल्फ्या काढण्यापेक्षा त्यांनाही normal माणसासारख राहू देन महत्वाच असत. त्यांचही इथ नमूद करण्यासारखं म्हणजे माझी अपेक्षा होती कि त्या थकतील पण छे! कधीच न थकता...सोबतच्या त्यांच्या जवळच्या मैत्रीण साठी नेहमी support करत चढत होत्या. सुंदरता आणि धाडस दोन्ही एकत्र नांदत होत. राकेश शेठ मुळ त्या मुंबई वरून ट्रेक साठी आल्या, आणि ट्रेक संपला कि लगेच मुंबई गाठली. कष्ट सर्वाना असतात... उगाचच एवढ्या स्पर्धेच्या जगात कोणी तग धरून राहू शकतात का?


सर्वात महत्वाच म्हणजे ७० जणांनी काही कुरबुर न करता आमच्यासोबत येन. मी तुमचेही धन्यवाद मानतो. असच सोबत येत जा....दरवेळी नवी दुनिया आम्ही नक्कीच दाखवू.

आपलाच भटका,

पंकज,

रणझुंजार ट्रेकर्स (७७०९१५९०४४).


1 comment: