Pratapgad to rasalgad trek
प्रतापगड ते रसाळगड
दिवाळी ट्रेक २०१८
प्रतापगड ते कुडपण ते वडगाव ते महिपतगड ते सुमारगड ते रसाळगड...........कधीच, कोणीच केला नसलेला ट्रेक.
चला थोड मग जाऊ
दरवर्षी
प्रमाणे यावेळीही दिवाळी ट्रेक जंगी होणार हे आधीच ठरलं होत. कारण यावेळी जावळीच
खोर पिंजून काढण ठरलं होत. २०१७ ची दिवाळी रायरेश्वर ते प्रतापगड १०२ किमी ३
दिवसात पायपीट चालून झाली होती. गेल्यावेळी वेळी जिथ ट्रेक end केला होता त्या प्रतापगडापासून यावेळी अतिशय
अपरिचित आणि कधीही कुणीही न केलेला ट्रेक प्रतापगड ते कुडपण ते वडगाव ते महिपतगड
ते सुमारगड ते रसाळगड असा longest and
lambest पण तरीही खुन्खार ट्रेक प्लान केलाच.
रानडुक्कराची
भेट........ भेकाराने समोरासमोर दिलेलं दर्शन,..... ट्रेक ची eligibility.... तुला पाहते रे .......अन भूक, जगबुडी नदी....
कृष्ण लीला!........ गुरखिंड.... तुम्हाला वाट सापडणारच नाही पासून record break वेळेत ट्रेक पूर्ण करून दाखवला तेही कुठच न
चुकता......शेवटची चुकलेली S.T. Bus......... अशा अनेक घटना ३ दिवसात घडत गेल्या. त्या पुढे उलगडतील.
वाघाची दयनीयता.
जावळीच्या खोर्यात माणूस
कमी आणि जनावर जास्त असा प्रकार सध्या तरी इतिहासजमा झाला आहे याच कारण आहे
माणसाची वाढती लोकसंख्या, आणि जंगलात मानवाच वाढलेलं अस्तित्व. जावळीच्या खोर्यात
कधीमध्ये बिबट्या दर्शन देतो, पण भेकारची संख्या बर्याच प्रमाणात आहे,
रानडुक्करांचा उच्छाद तर रोजचीच गोष्ट आहे खोर्यात, सोबतीला अनेक प्राणी आहेतच. पण
आम्हाला वरच्या तिघांचाच धोका होता, मी घरी सांगितलं तर घरातच कोंडून ठेवलं असत
म्हणून न सांगताच ट्रेक प्लान केला..
१९७२ च्या भारत सरकार
च्या वन्याजीव संरक्षण कायद्याने जंगली प्राण्यांना मारण्यास बंदी केली, याच मुळ
कारण होती वाघांची घटती संख्या, उठसूट कोणीही वाघ मारायचे, नावाला शिल्लक असलेले
राजे-महाराज, सरदार पिढी, उच्च पदावर काम करणारे, माझी गाय वाघाने मारली म्हणून
बदला घेणारे वनवासी, वाघाची शिकार करायची fantasy
असायची कारण त्यांच्या आधीच्या पिढीत वाघ मारण
म्हणजे शौर्याच प्रतिक होत. तीच fantasy पुढ जपली गेली आणि १९७२ पर्यंत कायदा नसल्याने कत्तल चालूच
होती.
Special ट्रेक ची पात्रता सुद्धा special च. (ऐऱ्या-गैऱ्याच काम नाही हे...)
तर ट्रेक प्लान केलेला पण
कोण कोण येणार हे नक्की नव्हत, दिवाळी च्या भयानक दमवनाऱ्या ट्रेक ला उच्च कोटीची physical fitness लागते. कारण एका
दिवसात कमीत कमी २५ ते ३५ किलोमीटर चालावच लागत, त्यात असत पाठीवर ओझ्झ ....
कमीतकमी २० किलो(जास्तीतजास्त घेईन तेवढ), कपडे-भांडी-स्वयपाक साहित्य-tent-पांघरूण. आणि
चालणं सपाटीच नसतच मुळात, चढ –उतार फक्त.
तरी सुद्धा या ट्रेक साठी
स्वतःहून उत्सुक असणारे १०/१५ असतात पण मी त्यांना eliminate
karto कारण physical
fitness आणि जास्त मानस आली कि जास्त मोठी भांडी लागतात
म्हणून ४-६ लोक निवडावी लागतात, नाहीतर जंगल मै अमंगल हो सकता है. एकामुळ स्पीड
कमी झाला तरी पुढच गाव गाठण अवघड होत आणि मग जंगलातच मुक्काम ठोकावा लागतो. दिवाळी
ट्रेक ची मोठी craze वाढल्यापासून दरवर्षी नवीन कोणीतरी येत असत आणि आधीच जुन कोण तरी सोडून जात
असत. कारण एक दिवाळी ट्रेक केला कि एवढी दमछाक होते कि वाटत पुन्हा कधीच भटकायला
नको.
पाहिलं पाऊल,
पहिली सुरवात....
पुण्यातून सकाळी पहाटेच
निघायचं होत पण कृष्णा उशिरा निघू म्हणाला मग थोडा प्लान बदलून निघालो. प्लान असा
होता कि,
पहिला दिवस-पुणे ते
प्रतापगड ४० लाखाच्या एश-टी ने, पुढे पायागाडीने प्रतापगड ते वडगाव via कुडपण खुर्द,
दुसरा दिवस –पायगाडीने वडगाव
ते सुमारगड via वाडी बेलदार.
दिवस तिसरा – पायगाडीने सुमारगड
ते रसाळगड आणि पुढे ४० लाखाच्या एश-टी ने पुणे via महाबळेश्वर
पण वरील प्रमाणे अस काही
झालच नाही. प्रतापगडापासून आम्ही चालण्यास सुरवात केली, कुमठे गावापर्यंत
माणसाच्या वर्दळीत निघालो, कुमठेतून खरोशीला भिलारे नावाचे बाबा निघालो होते, ते
म्हणाले चला तिकडच आहे वाट दावतो, मग तिघ निघालो, कुमठ्यातून तासाभरात डांबरी रस्ता
संपतो तिथून थोड पुढ गेल कि एक डाव्या हाताला बैलगाडी सारखा रस्ता आहे. तिथून खाली
उतरायला निघालो इथून पुढ भिलारे बाबा सुद्धा नव्हते, आता पुढ दोघच, दोघच असण हा
जरी तोटा असला तरी दोघच असलो कि झटक्यात अंतर cover होत, तस तो रस्ता एक दोन बंद असलेल्या गुरांच्या
गोठ्यातून पुढ जातो, शेवटी २/३ घर आहेत as वाटत पण ती सुद्धा आता बंद आहेत, गाव
उठून खाली गेलाय, त्या गावातून उजव्या हाताला उतरलं कि एक वाडी आहे आणि डाव्या
हाताला उतरलं कि कुडपण बुद्रुक चा न वापरलेला पण ढोरवाटेन खाली जाण्यास रस्ता आहे,
दोनच तासात कुमठे गावातून कुडपण गावात पोहोचलो, स्पीड तसा चांगलाच होता, कारण ताजा
दम आणि जास्तीच चुकण झाल नाही.
कुडपण
बुद्रुकातील चिकणे आज्जी
कुडपण गावात पोहचेपर्यंत
४:३० वाजले होते, वडगावात पोहचणे आजच टार्गेट होत पण कुडपण च्या चिकणे आज्जी
म्हणाल्या कि वडगाव इथून ३-४ तास लागतील म्हणून मुक्काम इथच ठरवला, आज्जी ने आसरा
दिला, भात करणार म्हणाल्या नुसताच पण जेवताना अर्धी अर्धी तांदळाची भाकर सुद्धा
दिली..... तर चिकणे म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, त्यांची मुल आता शेती करत
नाहीत पण पुण्या-मुंबई ला राहून मदत करतात, खूप मायाळू होत्या पण खूप जास्त बडबड
करत होत्या, सुरवातीला आम्हाला बर वाटल पण नंतर कंटाळा येऊ लागला होता. (जस लग्न
झाल कि बायकोच होत तसच असत) जेवण ७ च्या आतच तयार करून झाल होत पण ....
तुला पाहते रे
.......अन भूक
मराठी serials ने
यासुद्धा गावात धुमाकूळ घातला होता, तुला पाहते रे साठी आज्जी म्हणाल्या कि आधी
serial मग जेवण, आम्ही तर सकाळपासून उपाशीच पण सांगायचं कस कि आम्हाला वाढा, घरात
राहायला दोघच पण शेजारच्या २ बायका १ आजोबा सुद्धा बरोब्बर timing ला serial
पाहायला आले. तुला पाहते रे serial लागली आणि पोटातले कावळे बाहेर येऊ का पहायला
as म्हणायला लागले.
पण काय कराव ती ‘तुला
पाहते रे’, आणि आम्ही दोघ आज्जी कधी जेवण देताय म्हणून ‘आज्जी तुला पाहतो ग’ ....
हाच एकमेव पर्याय. serial जशी संपली तशी आम्ही हात-पाय धुवले, पण लगेच दुसरी
serial लागली, त्यानंतर चला हवा येऊ द्या, १० वाजून गेले, हा कार्यक्रम माझापण
आवडीचा पण पोटात भूक असल्यावर डोक्यात हवा जात नव्हती, आता मात्र वडगावात जाऊन
जेवावं अस वाटत होत. शेवटी २ म्हातार्या उठून गेल्या त्यांना बहुधा हवा येऊ द्या
मधली हवा आवडत नसावी किवा पुणेरी jokes डोक्याच्या उजव्या-डाव्या बाजूने किवा
डोक्यावरून जात असावेत.
serial पाहताना एखादा dialogue हेरोईन विषयी कोणी मारला कि
इकडून शिव्यांची मालिका दोन्ही आज्जी सुरु करायच्या. जो या अज्जीना पटवून देईन कि
ते खर नसत, खोट असत त्याला oscar (नाहीतर आजीचा धप्पक लाडू तरी नक्कीच) नक्कीच
मिळेल. १० ला चिकणे आजीने जेवण वाढल, दही-अर्धी तांदळाची भाकर आणि भात unlimited.
रात्र सरता
सरेना......
अंगणातच अंथरून टाकून
मस्त ताणून दिली, पुन्हा ११ पर्यंत serials आतमध्ये चालूच होत्या, थंडी जाम वाजत
होती, पण झोपच येत नव्हती, इकड कृष्णा पडला कि झोपला, रात्रीच उठलो, पाणी पिल,
बसून राहिलो, चांदण खूप सुंदर दिसत होत, थोड्या वेळ बसून राहिलो. मग झोप आली,
पुन्हा रात्रभर कुत्र खाडखुड केल कि जाग यायची, ३ नंतर तर डोक्यात उद्याचेच प्लान
चालले होते, पहाटेच निघायचं होत, ५ ला उठून पुन्हा बसलो, थोडी आवारावर केली आणि
निघालो वडगाव कडे, जुजबी माहिती घेतली आणि पुढ पायपीट चालू केली.
कुडपण ते वडगाव
भर्काटन...
कुडपण बुद्रुक के वडगाव पर्यंत जी वाट होती त्या वाटेन सहसा
कोण ये जा करत नाही करत. कारण आता कुडपण ते पोलादपूर चांगला डांबरी रस्ता झाला
आहे, आणि वडगाव ते पोलादपूर सुद्धा एकदम टका-टक रस्ता आहे, गाडीने गेल तर ३ तास
लागतात, आणि चालत गेल तर २ तास पण गाडीनेच खाली जाण लोक पसंत करत आहेत, कारण कुडपण
गावाची वाढलेली आर्थिक सुब्बता, जुन्या घरांनी कात टाकली असून आता नवीन शहरी
पद्धतीन घराचं काम चालू आहे.
महाराष्ट्राचे
पहिले महावीर चक्र प्राप्त करणारे कृष्णाजी
कुडपण bk तून पोलादपूर रस्त्याने १ किमी चालत गेल कि एक
वाडी लागते, तिथून खाली वडगावात उतरता येन सहज शक्य आहे. तिथ एक बौद्धवाडा आहे. सुभेदार
मेजर कृष्णाजी सयाजी सोनावणे, १९४७/४८, १९६२, १९६५ युद्धात अतुल्य कामगिरी करणारे
सुभेदार मेजर कृष्णाजी सयाजी सोनावणे याचं हे मूळ गाव, अतिशय चांगल्या पद्धतीने या
आठवणीच जतन केलेलं आहे. त्यांच्या लहान भावानेच आम्हाला अगत्याने बोलावले, आणि
वाटही दाखवली, कुडपण मधून येताना जो धबधबा कोसळताना दिसतो त्या धबधब्याजवळच
बौद्धवाड्यातून वाट उतरते, धबधब्याच्या नादाला न लागता सरळ थोड वर चढल कि एका
मोठ्या झाडापासून खाली उतरणारी वाट आहे, सध्या वाट मळलेली नाही, पायाखाली गवत वाढल
आहे, त्यामुळ जरा सावधच उतरणे.
जगबुडी नदी
१/२ तासात गर्द झाडीत हरवलेली वाट खाली जगबुडी नदीच्या पात्रात सोडते,
नोव्हेंबर महिन्यात सुद्धा काय पाणी दिसत पूर्ण काचेळी, तळ दिसतो, स्वित्झर्लंड
मध्ये सुद्धा अशी तळी नसतील अशी ठिकाण आहेत महाराष्ट्रात, plus-valley सारखीच आणि
देवकुंड पेक्षा नितळ पाणी इथ आहे. सकाळी गारठा असल्याने अंघोळीचा प्लान दुपारी
करायचं ठरलं, समोर अप्रतिम पाणी असून सुद्धा उतरू वाटत नव्हत कारण अजून थंडी वाजतच
होती. पुढ पुढ नदीच्या पात्रात चालण म्हणजे चालण्याचा वेग अर्ध्यापेक्षा कमी करण
होत, उजव्या डाव्या बाजूला वाट शोधत निघालो पण थोड्या रडत-खडत चालीन उजवीकड जाणारी
वाट सापडली, मग पुढ गेल कि पुन्हा डाव्या हाताला नदीच्या पात्रातून गेल कि ढोर वाट
direct वडगाव बुद्रुक मध्ये सोडते. इथून पुढ नदीच पात्र खूप मोठ झाल आहे, इथ
आल्यावरच कळत कि या नदीला जगबुडी नदी का म्हणतात,
छे छे! आमच्या वडगावातून
महीपतगडावर जायला वाटच नाही!
वडगावात (बुद्रुक) मध्ये
पोहचल्यावर महिपतगडावर जाणारी वाट विचारली तर कोणालाच माहित नाही अस कळल, मग
नदीच्या पलिकड वडगाव खुर्द (धाकल वडगाव) आहे तिथून विचारव म्हणून तिकड पोहचून
विचारलं तर एक म्हातारबाबा म्हणाल हा समोरचा महिपतगड नाहीच, पण आमचे परमपूज्य गुरु
google बाबा तर समोरच महिपतगड दाखवत होते, आता मात्र पंचायत झाली, अजून पुढ गेलो
तर लोक येड्यात काढायला लागली............ “”वाट होती आधीच्या काळी, आता नाही जात
कोण वाटेन वर, तुम्ही पण आल्या पावलाने सुखरूप घरी जा, इकडून वाटच नाही”” अशी कारण
भेटली, पण कारणांची सुद्धा उत्तरे शोधणारे आम्ही, आधीच ठरवून आलेलो जायचं म्हणजे
जायचच. वाट इतिहासातून हरवली असेलही पण वाट तिथच होती, आता गचपण वाढल असेल.
प्रयत्न सोडन आपल्या बापाने शिकवलंच नाही म्हणून इथवर आलोय, शेवटी एका कट्ट्यावर
आम्हाला आमच उत्तर मिळाल एक माणूस सोबत यायला तयार झाला, त्याचं नाव रवी, ३०/३५
वयवर्षे, तो म्हणाला घरून भाकर घेऊ आणि निघू.
रवी- पारायण
तर रवी महाशयांच्या घरी
आम्ही पोहोचलो, त्यांची बायको आम्हाला पाहताच संतापात दिसली, कारण मळणीच काम
अंगावर घेतलं होत आणि दुसर्या माणसाला सांगितलं होत कि येणार म्हणून, रवी ची बायको
म्हणजे साक्षात सरस्वतीच, रवीच्या तोंडातून एक शब्द निघेपर्यंत ४० ते ५० शब्द एका
झटक्यात प्रकाशाच्या वेगान बाहेर पडत होती, रवी समजावण्याच्या सुरात म्हणत होता कि
घरी कोणीतरी आलाय त्यांच्या समोर तरी बोलू नको पण बायको मात्र सरस्वतीचे updated version होती, ती म्हणली
त्यांना पण कळू दे घरच कस चालू आहे, आम्ही मुकाट्याने घरी रताळी खाल्ली, तोपर्यंत
रवीन बोलणी खाल्ली, आमच आणि त्याच पोट वेगवेगळ्या गोष्टीने भरल मग निघालो
महीपतगडाकड, रवीने सोबत मंग्या नावाच्या मित्राला हाक मारली तो एका पायावर तयार
झाला. मग थोड पुढ गेलो कि देशी दारूच घरगुती दुकान होत, त्या दुकानातून रवी
साहेबांनी ४० रुपयाची फुल मोहाची देशी घेतली, मंग्याने हत्यार घेतलं.
धामण सापाची झालेली घालमेल
वडगावातून समोरच महिपतगड
दिसतो पण तिकड सरळ चढता येत नाही. त्यासाठी गाव संपल कि लगेच डाव्या हाताला एका
लहान धारेन वर चढल कि मीठ खडा किल्ला समोर ठेऊन महिपतगड गाठता येतो. चढाला सुरवात
करण्याच्या आधी मी कृष्णा आणि रवी असे तिघ शेतातून जाताना खाली धामण दिसली आणि
त्याच वेळी shortcut घ्यायच्या नादात मंग्या तिकड खालून गेला आणि मग रवीने ओरडून
त्याला अडवलं कि समोर साप आहे. मंग्या खाली आम्ही वर आणि साप मधेच अशी सापाची १
मिनिटासाठी घालमेल झाली, सापाला कमी दिसत पण कंपन जिकड ऐकू जातील त्याच्या विरुद्ध
बाजूला साप जातोच, पण इथ दोन्हीकड कंपन असल्याने गोंधळला, मंग्याकड हत्यार होतच
त्यान एका सेकंदात जीव घेतलाच असतो पण मी म्हणलो कि मला फोटो काढायचाय म्हणून
सोडला त्यान, एक जीव वाचला मनात बर वाटल, पटकन mobile काढून video काढला, ६/७ फुटाची,
काळसर-पिवळसर रंगाची धामण हि बिनविषारी असते, मग तोपर्यंत धामनीन बीळ शोधून गायब
झाली,
वडगाव खुर्द ते
महीपत उभा छातीवरचा चढ.
डाव्या बाजूने एकदम
महिपतगडच्या विपरीत दिशेन चढाई चालू केली. समोरच मीठ खडा चा कातळ दिसत होता.
माझ्या पाठीवर ३५ किलोच आणि कृष्णाकड जवळपास २० किलोच ओझ्झ होत. रवी ने बेल्ट मध्ये समोर देशी ची बाटली आणि
कंबरेला माग चिरगुटात २ तांदळाच्या भाकर घेतल्या. मंग्या तर रिकामाच निघाला. एका
दमात आम्ही बराच वर आलो, बिना वज्ज्याची दोघ पुढ पुढ पळत होती, आता break घेण
गरजेच होतं, कारण ऐन दुपारी चढाई करण फार अवघड असत, घामाच्या धारा वाहत होत्या,
अंग पूर्ण भिजल होत, श्वास भराभर घेऊन घेऊन घसा सुकला होता, समोरची मंडळी कणा-कणा
चढत होती, थोड अजून ताणून धरल, तास झाला होता, तासात आता श्वास नाकातून पुरत
नव्हता, घसा ओला तरी करावा अस वाटत होत, छाती फुटती कि काय अस भाता चालू होता, आता
भात्याच्या आवाज स्वताला ऐकू जात होता, आणि शेवटी कृष्णा म्हणालच कि आता जरा बसू
या, तिथच बसलो, पाणी पिल, कोरभर भाकरी,
आणि संत्र वाटून खाल्ली, मग आम्हाला दमलेल पाहून रवी आणि मंग्या ने ओझ्झ घेतलं,
आता मोकळ मोकळ वाटत होत, आता वर्षभर जरी चला म्हणाल तरी चाललो असतो अस वाटल( असा
विचार ओझ्झ कमी झाल कि वाटतोच). १५ मिनिटात आडव्या दंडाला लागलो, रवी शेठ ने
तोपर्यंत अर्धा खांब पोटात ढकलला होता.१५ मिनिटातच थकल होत बिचार कारण ओझ्झ च तेवढ
झालेलं, मग तो थांबायचा आम्हाला वेगवेगळी रानातली झाडांची नाव सांगायचा, औषधी
वनस्पतीची जुजबी ओळख झाली, मस्त माणूस आहे रवी कारण अशी ओळख करून देणारे कमीच(तस
मूळ कारण तो दमलेला होता आणि break ची त्यालाच गरज जास्त होती). वरच्या शेवटच्या चढला भिडलो तर
चढ संपता संपेना, पाठीमाग वळून पाहिलं( तस आई म्हणते ध्येयापासून वळून पाहू नये
पण) कसला नजरा ! एका नजरेच्या पट्ट्यात मधु मकरंदगड, चोरकणा, चकदेव, पर्वत, महिपतगडचा
कातील कोपिव कडा, जावळीच खोर, भीमाची काठी, मीठ खडा किल्ला,खालच वडगाव,जगबुडी नदी,
एका नजरेत हे डोळ्यात बसतच नाही, त्यासाठी डोळ्यांचा panorama mode सुरु करावा
लागतो. थोड पुढ गेल तर वरून कोणतरी हालचाल केल्याचा भास झाला, सोबतची कुत्री तिकड
गेली पण जनावर मोठ होत म्हणून भुंकून परत माघारी आली, तिला छु छु करून झाल
बर्याचवेळा पण घाबरली होती, वरती मोठ रानडुक्कर होत, डर सबको लगता है! आम्हाला पण
वाटल पण माघारी फिरणं अशक्य! पुढ गेलो तस जनावर आमच्या पुढ वरती निघून जात होत,
कुत्री खूप हुशार होती, बरोबर हुसकावून लावायला एखाद कुत्र सोबत असन खूप फायद्याच
ठरलं. इथून पुढ गावची गडी थकली पण आम्हाला पुढ जायचं असल्याने त्यांना break च घेऊ दिला नाही,
त्यांना सुद्धा अप्रूप वाटल, शेवटी रवी बोललाच कि अधून मधून लोक येतात पण १० वेळा
तरी खाली बसून येतात, नाहीतर आम्ही चढलेल पुन्हा उतरून मानस पुन्हा वरती आणतो,
तुम्ही तर दोन दमातच गड गाठला, त्यांना कस सांगायचं कि तुमच्यासाठी हा एक गड आहे
पण आमच्यासाठी गड किल्ले एक आत्मा आहे. आमची भक्ती आहे गड-किल्ल्यावर.
पुन्हा रवी शेठ ने बाटली खोलली,
औषध बाहेर काढल, गडी रंगात आला होता, बऱ्याच कथा सांगत सांगत बाटली तळाला
पोहचवली.शेवटची खिंड पार करून एकदम पुढ आलो तर समोरच सुमारगड! आणि सुमारगड च्या
आसपास फक्त किर्र जंगल, एक सुद्धा घर दिसत नाही इथून तर, निसर्गाच रौद्र रूप आणि
मनमोहक रूप याच दोन्हीच मिश्रण या Point ला येऊनच काळात. ऐन उन्हाळ्यात सुद्धा इथ हिरवगार जंगल असत.
थोट्याचा वाडा-
एकच घर! जिद्दी माणूस सह्याद्रीतला.
वर चढून आल कि उजव्या
हाताला महिपतगड कड जाणारी वाट आहे, आधी थोट्याचा वाडा म्हणजेच धनगर वाडा आहे.
आम्ही पोहचलो तेव्हा दुपारचे ३ वाजले होते, घरात बाबा भंडारी आणि त्यांची नात
सविता हे दोघंच होते. आजूबाजूला काही नाही, एकुलते एक घर, साध दुकान जरी म्हणाल
तरी २/३ तास खाली वडगावात उतरायचं, आणि तेवढंच पुन्हा वर चढायच, इथला माणूस तसा
श्रीमंतच असतो असा. कारण यांनी आल्या आल्या दह्याची रास समोर ठेवली, २ मोठ्या
वाट्या भरून दही पिऊन झाल, सिंहगडावर दही मिळत ३० रुपयाला चमचाभर, एकड पातेलभरून
मिळणार तेसुद्धा एका रुपयांची अपेक्षा न करता. बाबा खूप थकले होते,८० वर्षापेक्षा
जास्त वय झाल असेल, बोलताना थरथरणारे अंग आणि उभ राहताना लटपटनारे हाथ-पाय पण
चालायला उभा राहिला बाबा कि आरामशीर काठीने चालतोच. कारण इथ चालण कुणालाही सुटत
नाही, अगदी मरेपर्यंत!
सविता म्हणजे सह्याद्रीच रूपच,
आम्ही आलो तर आधी दही दिल, आणि गुरांना पाणी पाजायला निघून गेली, कंबरेला दोराने
बांधलेलं एक कोयता घेऊन, बिबट्याच दर्शन नियमित होणार्या या ठिकाणी एकटीन फिरणं
म्हजे तोंडची गोष्ट नाही,.((आपल्या इकडच्या पोरी म्हणजे झुरळाला पाहून थयथया
नाचणाऱ्या, उंदीर दिसला कि कांगारूउडी मारणाऱ्या, कोवळ्या उन्हात suns cream लावणाऱ्या)) पण
पुढच्या जन्मी सविता सारखी आई मिळावी अशी अपेक्षा करून तिकडून पुढ गडाकड प्रस्थान
केल.
बाबा भंडारी आजोबांनी पुढ
होऊन वाट दाखवली आणि सांगितलं तस आम्ही मार्गस्थ झालो. अर्ध्या तासात तर महीपतगड
वरच्या पारेश्वरच्या मंदिरात पोहोचलो.
महिपतगड-
पारेश्वर मंदिर-वाडी बेलदार.
पारेश्वर च मंदिर म्हणजे
गडावरच एकमेव मुक्कामच ठिकाण, (३०/४० माणूस आरामशीर राहू शकतो) इथ सगळी भांडी
कुंडी आहेत, लाकूड फाटा सुद्धा आहे. महाशिवात्रीला गडावर येण्यासाठी चोहू बाजूने
माणूस येतो, १००० माणूस गडावर तरी असेल कारण पारेश्वर हा खालच्या बर्याच गावांचा
कुलदैवत सारखा देव आहे. कुलदैवत हा प्रकार शहरी किवा प्रगत भागात असतो. वनवासी
भागात एका दिवसाची कुटुंब काबिल्यासाहित यात्रा असते, टोळ्या-टोळ्या वाजत गाजत आणि
हर हर महादेव च्या घोषात गड पुन्हा जाग करतात. शिवरात्रीला मुद्दाम येऊन पाह्ण्याच
हरिश्चंद्रगदासारख दुसर ठिकाण आहे महाराष्ट्रातल, महिपतगड.
पारेश्वर हे नाथपंथीय
होते, पारेश्वर च्या अनेक आख्यायिका असतील सुद्धा, पण वाकाटकांच्या काळाच्या अगोदर
सुद्धा आश्रम अवस्था अस्तित्वात होती, हिंदू हा शब्द प्रचलित होण्याआधी नाथ पंथीय
लोक ध्यान धारणा, वैराग्य आणि जीवनाची उत्तर शोधायला अतिशय शांतेतेच्या ठिकाणी
वास्तव्यास असत. नंतर पारेश्वराच्या मंदिरात महादेवाची पिंड बसवण्यात आली असावी.
महादेव हे कथेतील काल्पनिक पात्र असून पारेश्वर हे खरे खुरे मनुष्य होते. त्यामुळे
पारेश्वर म्हणजे महादेव म्हणणे चुकीचे ठरेल. तिथून लगेच आम्ही बाबा भंडारी नी सांगितल्याप्रमाणे
light च्या खांबाच्या
धारेन खाली वाडी बेलदार गावात १५ मिनटात पोहचलो.
वाडी बेलदार
स्वर्ग-सुंदर गाव.
अतिशय टुमदार अस गाव आहे
वाडी बेलदार, महाराष्ट्र सरकार ने वाडी जैतापूर (तळ-कोकण) पासून वाडी बेलदार पर्यंत मुरमाड रस्ता केला आहे. एश-टी वाडी
जैतापूर पर्यंतच येते, तिथून २ तासात कंटाळवाण्या मोठ्या मुरमाड रस्ताने चालत वाडी
बेलदार पर्यंत येते, वाडी बेलदार पर्यंत पोहाचतानाच गणपत निकम (जे कि वाटाड्या
आहेत महीपत गड किल्ला दाखवायला, किवा महिपतगड पासून सुमारगड मार्गे रसाळगड
दाखवायला) भेटले, पहिल्या वाक्यातच त्यांनी आम्हाला हेरल आणि रसाळगडपर्यंत सोबत
न्यावच लागेल अस म्हणाले. मी म्हणलो बघू तुम्हाला सांगतो पुढच पुढ, आधी थोड आराम
करतो.
गणपत शेठ त्यांच्या घरी
घेऊन गेले, चहापाणी झाल, पण जेवणाची सोय होऊ शकत नव्हती कारण त्यांची बायको सुध्दा
रवी च्या बायको पेक्षा जरा कमी तिखट बडबड करण चालू होत. मग त्यांनी स्पष्ट
सांगितलं कि स्वयपाक तर नाही होऊ शकणार, एवढ्यात गणपत शेठ चे भाऊ सहदेव निकम त्याच
घरात राहतात ते म्हणाले तुमच्या हाताने करून खाणार असाल तर करा आणि खावा, कारण
आताच माझी open-heart surgery झाली आहे. डॉक्टर ने सांगितलं कि धुरापासून दूर राहायचं,
त्यांची बाईल कार्तिकी साठी पंढरपूर ला गेली होती, आम्ही तर तयारच होतो. अंघोळीला
गेलो, मस्तपैकी अंघोळ केली, किती थंड पाणी, पण सकाळची अंघोळ राहिली होती, आता ती
करण गरजेच होत नाहीतर अंगाचा आणि कपड्याचा असा सुगंध दरवरला असता कि दुसर्याच्या
नाकातली केस सुद्धा जळली असती. स्वयपाक करण्यासाठी घरी आलो तर सहदेव शेठ म्हणाले
कि दही भात खाणार का! आम्ही तर नुसता भात पण खाल्ला असता, लगेच हो म्हणालो,
राणीची
घरवापसी.......
राणी नावाची कुत्री वडगावातून आमच्यासोबत वाडी बेलदार
पर्यंत आली, राणी ६ महिन्यापूर्वी वाडी बेलदार मधून खाली वडगाव मध्ये गेली होती ती
आमच्या सोबत ६ महिन्यांनी परत आली, तिची पिल आता मोठी झाली होती, पण त्यांनी ओळख
सोडली नव्हती, गणपत बाबा तर म्हणले आम्हाला वाटल वाघानेच नेली कि काय! तुमच्या मुळ
आली बर वाटल, लैई हुशार कुत्री आहे, जनावर बरोबर हेरून काढते, मग गावातल्या दुसर्या
लोकांनी देखील विचारपूस केली कुत्री आलीच कशी म्हणून, कारण कुत्र असण म्हणजे भीती कमी
असते, थोड कुठ वाजलं कि लगेच सतर्क राहणार इमानी जनावर. आम्हाला पण अनुभव आलाच
होता राणीन माग गड चढतानाच बरोबर रानडुक्कर शोधला होता.
घोणस सापाचा
attitude
पुन्हा घरी आल्यावर गाव
फिरून पाहिलं, गावात एक मंदिर आहे तिथ ३० लोक आरामात राहू शकतात, मंदिर पाहतानाच
एक घोणस जातीच सापाच पिल्लू एवढ्या attitude ने slowly चालल होत कि जणू रस्ता
माझ्या बापाचा आहे अस, घोणस हा विषारी जातीचा साप असून लहान साप तर मोठ्यापेक्षा
विषारी असतात, नक्कीच त्याची पोटपूजा झाली असणार म्हणून हळू हळू जात होता. त्याला
disturb न करता सुमारगड च्या दिशेन जाऊन
सकाळी जायच्या वाटेचा शोध घेतला, थोडा अंदाज बांधला, आधीच महिपतगड ते रसाळगड विषयी
पोटभर अभ्यास झाला होताच, सर्व वाचून झाल होत, वाट शोधण कला आहे आणि माझ्या २४८
ट्रेक मध्ये तीच कला शिकलो होतो. नवीन काहीतरी शोधायचं, आजपर्यंत जे केल नाही ते
करायचं, वाट चुकण हा तर धर्मच आहे आमचा पण आपल ध्येय कधीच चुकवल नाही किवा कधी
माघार घेतली नाही. कृष्णाला सांगितलं कि आपण करू शकतो, कृष्णा तर आपल्या
शब्दाबाहेर कधीच नाही, तसा जिगरवाला आणि भीती असून पण मी सोबत असलो कि १० हत्तीच
बळ येत अस मानून चालणारा.
गणपत बाबा..... अट्टहास...उपहास....
गणपत शेठ दारात वाटच पाहत
बसले होते. ते म्हणाले काय नियोजन उद्याच, मी स्पष्ट बोललो कि आम्ही दोघच जातो
सुमारगड मार्गे रसाळगडला, एकतर आम्हाला सवय नाही वाटाड्या म्हणून सोबत
घ्यायची(अपवाद फक्त आणि फक्तच गुगल बाबा), गणपत बाबांचा rate होता १५०० रुपये
फक्त (जो आम्हाला दोघांना परवडणारा पण नव्हता), गणपत बाबा अडून बसले आणि त्यांनी
पुढीलप्रमाणे dialogue मारले,
“” कि दोघ गेलात तर नक्की जंगलात फसाल,
जंगलात वाघ आहे, जनावर बेकार आहे, १००० रुपये द्या पण अस तुम्ही दोघ जाऊच शकणार
नाही, महिपतगडवर परवा एक माणूस चुकला, अख्खी रात्र महिपतगडवर त्यान घालवली, रात्री
फसलेला माणूस सकाळपर्यंत जंगलात एकटाच येड्यासारखा भटकला, सकाळी पुजारी जेव्हा
गडावर गेला तेव्हा त्याला हाका ऐकू आल्या आणि तो त्या दिशेने गेल्यावर माणूस
घावला, रडून रडून लाल झाला होता म्हण, तुमच्या पुण्याचाच हुता त्यो,....... त्यो
तर महिपतगड वर चुकला आणि तुम्ही तर सुमारगड कड जायची daring करताय!””
अस बराच वेळ प्रवचन आम्ही
ऐकल पण आमचा अट्टहास कायम ठेवला कि जाणार तर दोघंच. शेवटी गणपत बाबांनी हार मानली,
म्हणाले आताच तुम्ही खाली जावा वाडी जैतापूर ला आणि तिथून पुण्याला जावा. थांबू
सुद्धा नका. कारण सुद्धा तस होतच कारण १०००-१५०० चा फटका(कि झटका)त्यांना बसला
होता. मग त्यांनी रागातच पुन्हा म्हणल, कि तुम्ही जाऊच शकणार नाही, गपचीप घरी
जा, मग मी समजुतीच्या सुरात म्हणाल “बाबा
राग धरू नका मनात, आम्हाला आमची वाट शोधायची जी मज्जा आहे ती कायम ठेवायची आहे,
चुकणार तर आहोतच, शेवटी जर वाट कळलीच नाही तर जस गेलोय तस माघारी येणार, आणि इथूनच
पुण्याला जाइन, पण आम्ही प्रयत्न सोडणार नाही” मग मात्र बाबा उठून त्यांच्या खोलीत
गेले आणि आम्ही सहदेव बाबांच्या घरात दही-भात खाल्ला. ७ च्या सुमारास जेवण झाल
सुद्धा, ७;३० ला तर अंथरुणात झोपलो सुद्धा, उद्या सर्वात मोठा पल्ला गाठायचा होता
आणि तेसुद्धा दुपारी १ च्या आत रसाळगड गाठायचा होता, कारण १ वाजता एश-टी गाठली तरच
पुढ खेड वरून पुण्याला जाणारी एश-टी मिळण अवघड होत..
mobile चार्गिंग ला लावला
९ पर्यंत उद्याचा प्लान केला, गणपत बाबा झोपी गेले पण, माझी झोप मात्र उडवली,
स्वप्नात एवढी बडबड बडबड चालू केली. त्यात कहर म्हणजे कोणत्यातरी बाइला शिव्या देत
होत म्हातारबाबा, इतक्या शिव्या कि कान पिकले, मुळातच गहन शांतता असलेल ठिकाण अन
त्यात घरात झोपलो, भूकंप यावा अस वाटत होत, कमीत कमी सुनामी तरी येउदे अस झाल होत.
बाई स्वप्नातून निघून गेल्यावर बाबा शांतीन झोपले आणि मीसुद्धा. कृष्णा तर पडला कि
झोपतो, पुन्हा ३ ला जाग आली ती कोंबड्यामुळ, मग कसली झोप तेव्हा, उशिरा उठल तर पुढ
पुणे गाठण अशक्य होईन म्हणून ३ पासून जागाच राहिलो. ५ ला बाहेर अंगणात आलो तर कसलं
चांदण पडल होत, लख्ख दिसत होत, सप्तर्षी जो उत्तरेकड ध्रुव ताऱ्याच्या रेघेत असतो
तो अतिशय प्रखरतेन चमकत होता, डोळ्यानी जे सौंदर्य दिसत होत त्याच वर्णन अस करू
शकत नाही, पण दिव्य असत सगळ.
एकदा ठरलं कि पुन्हा बदलायचं नसतच! नियम आहे आमचा तर!!!!
सकाळी ५:१५ पर्यंत आवरून
तयार झालो, दोन्ही बाबा उठले, मी म्हणल जातो बाबा तर गणपत बाबा म्हणाले अजून पण
इथूनच घरी जावा, त्या वाटेच्या नादाला सुद्धा लागू नका, सहदेव शेठ ना सोबत घेतलं
म्हणालो कि, फक्त गावाच्या बाहेर पर्यंत वाट दाखवा, सहदेव बाबांनी वाट दाखवली
(गावातून थोड खाली उतरलं कि समोरच्या धारेवर चढून सरळ धारेन जाणारी वाट अशी जुजबी
माहिती त्यांनी दिली, सहदेव बाबा तर गणपत बाबांच्या पण पुढ जाऊन म्हणाले, कि वाट
तर तुम्हाला घावणारच नाही कारण १०० वाटा आहेत, तुम्ही ज्या धारेन वर जाणारे त्या
धारेन हरवलं तर पुन्हा त्याच धारेन खाली वाडी जैतापूर ला उतरा, इकड येऊ सुद्धा
नका. पूर्ण अविश्वास कसा असावा याचं उदाहरण आहे समजून आम्ही ६:३० च्या आसपास दोघंच
निघालो एक बेफिकीर mood मध्ये, आता पुढ नक्कीच फसगत होणार हे कळून चुकल होत, confidence level अर्ध्यावर गेला
होता, पण ज्याच्या जीवावर उड्या मारतो तो अनुभव सोबत होता म्हणून अंधारात चाचपडतच
सुरवात झाली.
आता खर भर्काटन! रानडुक्कर धडकेच्या तयारीतच......
आता इथून सहदेव बाबांना निरोप दिल्यावर २ मिनिटातच एका
पात्रात आम्ही उतरलो, पुढ तर वाटच दिसत नव्हती, मनात विचार लगेच आला १०००/१५००
परवडले असते का? २ मिनिटातच अंधारात शोधाशोध केली, २/३ वाटा सापडल्या, आता जायचं
कुठ असा विचार पडला, सरळ धारमाथा गाठून पुढ जाव म्हणून पुढ चढलो, पुढ मळलेली एक
वाट मिळाली, मग काय आमच्या पायगाडीने direct पाचवा gear टाकला, झपाझप चाल
चालू केली, माथा गाठला कि पलिकड पाहिलं धुक्याची चादर पांघरलेल वाडी जैतापूर आणि
खेड चा काही भाग, पूर्ण पांढरी शाल आणि त्यातून थोडे वर आलेली डोंगराची शिखरे,
नयनरम्यच, वेळ वाचवायचा होता म्हणून धावती नजर चोरुनच घेतली नाही तर तासभर इथच
थांबाव अस वाटत होत, थोड पुढ गेलो कि कसला तरी समोरून आवाज आला, काळजीपूर्वक समोर
गेल तर आमच्या डाव्या हाताला खाली रानडुक्कर हुंकारत आल होत, इलाखा त्याचा होता,
आम्ही तर पाहुणे, दोन मिनिट शांततेत गेली कारण वाट तर आमची अडवून धरलीय, काय
करायचं विचार केला आणि ४/५ दगड हाणली त्याच्यावर तेव्हाकुठ ते जागा सोडून खाली
गेल, रस्ता मोकळा झाला होता, पण भीती होतीच कि वाटेला लागलो कि जोरात येऊन धडक देत
कि काय, पण धारेधार हत्यार सोबत होत म्हणून भीती संपलेली होती, वाट पार करून पुढ
गेलो, पुढ राया धनगराच झाप लागल, तिथ आता कोणीच नाही,
फसवाफसवीच्या वाटा गुरखिंड गाठेपर्यंत
इथून खरी गम्मत चालू झाली कारण इथून डोळ्यासमोर ३/४ ढोरवाटा
निघाल्या, अंधार निवळलेला होता, २ वाटा जरा पुढ जाऊन पहिल्या कि कळाल ढोरवाट आहे
म्हणून मग मधली वाट धरून पुढ चालन ठेवलं, जास्त चढ नाही पण वाटा खूप फुटल्या आहेत,
ज्याला अनुभव नाही ढोर वाट कोणती आणि पायवाट कोणती त्याची मात्र गफलत होऊ शकते, मग
तासाभरातच गुरखिंडीत दाखल झालो. गुरखिंड म्हणजे अशी जागा जिथून डाव्या हाताला
डोंगरावर चढणारी वाट सुमारगड कडे घेऊन जाते, आणि पलिकड खाली घेऊन जाणारी वाट
रसाळगडाकड नेते. शक्यतो इथच पाठीवरच ओझ्झ ठेऊन सुमारगड पाहून आल पाहिजे, आणि पुढ इथूनच
रसाळगड कडे गेल पाहिजे, आम्ही खिंडीत पोहोचलो पण आम्हाला कळल नाही कि हीच ती
गुरखिंड, आम्ही ओझ्झ घेउन सुमारगड गाठला,
मग कळल कि पिशव्या तर खालीच ठेवल्या पाहिजे होत्या,
सुमारगड.
गुरखिंडीतून वर चढल कि
सुमारच्या समोरच्या डोंगराला बिलगून आपल्या हाताच्या डाव्या हाताने एक वाट वर
चढते, मग एका ठिकाणी वाट बंद करण्यासाठी barricades
सारख कुंपण लावलं आहे, ते ओलांडून पुढ कि समोरच
सुमारगड दिसतो, मग १० मिनिटाचा चढ चढला कि आपण थेट सुमारगडाच्या सुळक्याखाली येतो,
Romantic कडा
इथून आपल्या हाताच्या डाव्या बाजून आडवी वाट
गडाकड नेते. आडव्या वाटेन चालल कि एक कडा बाहेर आला आहे, हा कडा भलताच romantic
आहे, त्याला मिठी मारूनच पुढ सरकत जाव लागत, त्याला मिठी मारण compulsory आहे, कारण जर
त्या कड्याला मिठी मारली नाही तर खालच्या दरीला मिठी मारावी लागते, खाली पडल कि लगेच
बिना तिकिटाच स्वर्गाची सफर घडून येऊ शकते, म्हणून शरीराचा तोल सांभाळत हळूच ५
फुटाचा तो कडा बिलगून पार आलो, ज्यांना अनुभव नसेल त्यांनी रस्शी लावून कडा पार
करावा(on your own risk!)
नावाला सुमार(गड)....
बाकी गड मात्र देखणा...
Romantic कडा पार केला आणि पोहोचलो बरोबर शिडी पर्यंत, मागच्याच
वर्षी लोखंडी शिडी बसवली आहे, त्याआधी मात्र एक tv ची काळी cable टाकली होती, त्या
cable वरून २० फुटाचा कडा चढल कि मग थोड्या घसरड्या वाटेन वर चढायला जागा आहे,
शिडीन वर पोहोचलो डाव्या हाताला सती शिळा आहे, पुढ एक अनोळखी देवाच देऊळ आहे, वरती
पाण्याची टाकी आहेत, गडावरून काय नजारा दिसतो! सुमारगड म्हणजे टेहेळणी करायला
सर्वात आवडत ठिकाण असाव, गडावर माणसांची वर्दळ नसल्यामुळ उंदीर-सापांची वर्दळ फार
आहे, १० जणांना झोपण्याएवढी गुहा सुद्धा आहे, जास्तीच फिरण्यापेक्षा आम्ही खाली
उतरण पसंद केल कारण १ ची एश-टी पकडायची होती. इथच थोडा नाश्ता केला, बर वाटल जरा,
घड्याळ पाहिलं तर अजून ८ च वाजले होते, म्हणजे आम्ही वेळेच्या आधीच बिना चुकता
ट्रेक पूर्ण केला होता, एवढ्या fast ट्रेक बहुधा कोणी केला नसावाच.
जखमेवर मीठ
मी चुकून विसरून full-pant च विसरलो, म्हणून half-pant वरच
ट्रेक केला, एवढी धसकाट आणि जंगलातले काटे टोचले कि सांगता सोय नाही, रक्त आल,
काही लागल तर काही वाटत नव्हत कारण आतापर्यंत पाय दगड झाले होते, पण घामेघूम
झाल्यावर जो पायावर घाम साठायचा त्यामुळ जखमेवर मीठ चोळल्यासारख वाटायचं, म्हणून न
थांबता चालण चालू ठेवलं. थांबल कि घाम येणार आणि जळजळ होणार हे समीकरण झाल्यामुळ,
थांबायची इच्छा मेली.
शेवटचा टप्पा...भेकराची
गाठ.
गुरखिंडित उतरलो, तिथून आता थोड खाली उतरलं कि डाव्या हातान
वाट आडव्या दिशेन पुढ सरकते मग पुढ गेल कि सुमारगड आपल्या डाव्या हाताला ठेऊन चालन
आपोआप येत, सुमारगड पाठीमाग पडला कि पुन्हा आपण एका खिंडीत येतो, इथून पुन्हा वाटा
फुटल्या आहेत, तर यावेळी बाजू पालटून उजव्या हाताला डोंगर ठेऊन मार्गस्थ झाल कि
वाट बरोबर एका डबक्याजवळ सोडते, गार पाणी प्यायचं, आता इथ सगळी जंगली प्राणी
पितात, (पाणी संपल असेल तरच पिणे नाहीतर पाण्यात किड्यांची वळवळ पोटात सुद्धा होऊ
शकते.) तिथून पुढ गेल कि दोन वाटा फुटतात डावी वाट मालदे गावात उतरते, उजवी
डोंगराच्या कडेन रसाळगडकड जाते, आम्ही जाताना इथ भेकर समोर दिसलं, त्याचा वेग
भयानक होता, भेकर आधीच लाजाळू प्राणी आहे, हरीण कुळातील भेकर असत, तांबूस रंगाच
भेकर मात्र २ उड्यातच दिसेनास झाल, जरा बर वाटल जीवाला नाहीतर अस वाटत होत आमच्या
दोघांशिवाय या जंगलात कोणीच नाही कि काय, ठिकठिकाणी रानडुक्कराच्या खुणा होत्याच,
जागोजागी वाटेवर बरच उकरून ठेवलं होत, मला वाटत मुद्दाम रस्त्याच्या बाजूला उकरल
असाव, आपल्याकड कस जागोजाग speed-breaker असतात तस भीतीचा speed-breaker त्यांनी तयार केला आहे, नजर हटी दुर्घटना घटी
असा seen असतो इथपण, आपले कान अर्धा इंचाने वर झालेला असतात, प्रत्येक आवाजाचा
कानोसा आपोआप होत असतो. जरा कुठ पानाची हालचाल झाली कि लक्ष तिकडच जात,
तो डोंगर उजव्या हाताला ठेऊन पार केला कि एक पुन्हा बंद
असलेला धनगर वाडा लागला, आतमध्ये अपेक्षेप्रमाणे कोणीच नव्हत, त्याआधीच रसाळगड
दर्शन झाल, सुमारगदापेक्षा बुटका,जेमतेम अर्ध्या उंचीचा रसाळगड. पण आकाराने आकर्षक
होता, या वाड्यापासून रसाळगड पर्यंत पूर्ण उतार आहे, धावतच निघालो, आता पर्यंत ६०
किलोमीटर चालणं झाल होत, गुडघ्याच्या वाट्या आता दुखत होत्या, पण आता रसाळ एवढ्या
जवळ वाटत होता कि थांबण शक्य नव्हतच, एका झाडाखाली अर्धा तास थांबून नाश्ता पुन्हा
केला,(पारले पुड्यात पाणी टाकायचं आणि खायचं), उर्जा मिळाली होती, दिवाळीचा थोडा
फराळ पोटात गडगडत ढकलला, इथून अजून खाली गेलो, रसाळ च्या आधीचा डोंगर पार केला कि
direct रसाळवाडी मग रसाळगड अर्धा तास चढाई अस दुरून गणित मनात चालल होत, आणि तिथून
न थांबता चालू केलेला प्रवास थेट रसाळवाडी मध्ये संपवला.

घड्याळ पाहिलं तर ११ वाजले होते, एका घरात पाणी मागून
घेतलं, ६:३० ला चालू केलेली महिपतगड पासून ४:३० तासात ट्रेक संपवला सुद्धा होता.
अविश्वसनीय होत, एकदा पण न चुकता, फक्त २ वेळा ब्रेंक घेऊन रेकॉर्डब्रेक वेळेत
ट्रेक केला होता. आता पर्यंतच्या माहितीनुसार सकाळी ७ ला चालू करणारे लोक
संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोहचतात, नक्कीच हा आमचा विक्रम असेलही पण विक्रमाच्या
पाठीमाग आम्ही नव्हतोच आम्हाला १ ची एश-टी पकडायची होती.
पिक्चर अभी बाकी
है मेरे दोस्त.........
गावात विचारलं कि एश-टी कितीची आहे तर ते म्हणाले २ ला
येते. अजून ३ तास होते, म्हणून एका ठिकाणी जेवण सांगून रसाळगड चढला, मस्तपैकी
पाठीवरच ओझ्झ खालीच ठेवलं होत म्हणून १० मिनटात गड गाठला, मस्त पैकी मंदिर आणि
मंदिराभोवती असलेली पाण्याची तळी पाहून झक्कास वाटल. पुन्हा माघारी फिरून एका
मावशी कड पुन्हा दही भात डाळ खाल्ली. मावशी म्हणाल्या पलिकड रत्यावर एष्टी आहे,
भेटेल आरामात २ ची गाडी, आम्ही १;३० वाजता
एष्टी ची वाट पाहत रस्त्यावर बसलो (झोपलो म्हणल तरी चालेल). खालून एष्टी चा आवाज
येऊ लागला, आम्ही जिंकलो अस वाटल, २ वाजले होते आणि आवाज बंद झाला एष्टी चा,
आम्हाला वाटल येत असेल घाटामुळ आवाज नसेल येत, म्हणून आम्ही निवांत होतो, गडावरून
एक खेडची मुलगी तिच्या गावाला आलेल्या भावाला आणि बहिणीला घेऊन उतरत होती, ती
म्हणाली कि एष्टी इथ नाही खाली लागते, मग प्रकाश पडला कि आवाज बंद कसा झाला ते,
मावशीने नीट सांगितलं नाही आणि आम्ही विचारलं नाही कारण नवा कोरा डांबरी रस्ता
समोर होता, तिथून ३०० मीटर वरच जिथ नवा रस्ता संपतो आणि मुरमाड रस्ता लागतो तिथून
एष्टी turn घेऊन खेड कड गेली सुद्धा, मग काय पुणे आज गाठणार नाहीच अस वाटल, कारण
यानंतर एष्टी नव्हतीच, रसाळवाडी मधली लोक येत होती एष्टी तून इकड, विचारपूस झाली मग
कळल खाली उतरल कि निवाच्या वाडी ला एष्टी मिळेल.सगळा पिक्चर संपला अस वाटल पण आता
डांबरी रस्त्याने पळतच खाली निघालो, कृष्णाला तर चालन सुद्धा मुश्कील झालेलं त्याच
आता पाऊल सुद्धा सरळ पडत नव्हत, गुडघ्याच्या वाट्या कपाळात गेल्या कि काय अस वाटत
होत, पण चालणं पुन्हा चालू झालेलं होत, ६ किलोमीटर डांबरी वाट नको नको वाटत होती,
दिसेल तो shortcut घेत खाली निवाच्या वाडीत पोहचेपर्यंत ४ वाजले, विचारपूस केल कि
कळल ५ ला एष्टी आहे, रस्त्याच्या कडेला बसलो, भेटेल त्या वाहनाने जायचं ठरलं, पण
वाहनच येईना. स्वप्न पाण्यात गेली, शेवट असा व्हावा अस वाटल सुद्धा नव्हत, भल्या
मोठ्या जंगलात चुकलो नाही पण डांबरी ने चुकवल होत,. पण काही केल तरी आज पुणे
गाठायचच हे ठरलं होत, ५ ला बरोबर एष्टी आली, ६ पर्यंत खेड ला आलो, ७ ला ठाणे
गाडीने पोलादपूर ला पोहचलो, इथ येऊन कळल कि आता एष्टी direct ११ वाजता आहे,
महाड-माणगाव मार्गे. आता वाट पाहणे हाच पर्याय. पण महाबळेश्वर इथून ३८ किमी आहे
म्हणून फाट्यावर तासभर थांबून एक टेम्पो भेटला.
टेम्पो ....
टेम्पो वाल्याने लिफ्ट दिली, कारण त्याला महाबळेश्वरला
जायचं होत, त्याला रस्ता माहित नव्हता, वय झालेलं होत, मूळ चेन्नई चा, तुटक्या
हिंदीत बोलणारा, जुनी पुराणी गाडी, माग लोड केलेला माल, driving अशी कि बोलायचं
नावच नाही, कारण एका हातात बिडी, एका हातात stearing अशी कसरत आणि त्यात अंबेनळी
घाट, ३० च्या स्पीड वर गाडी गेलीच नाही, १० वाजता महाबळेश्वर गाठल,
गाडीच नाही,
देवाच्या मनातच नाही म्हणायचं, पण.......
महाबळेश्वर ला पोहचलो गाडीची चौकशी केली तर कळल शेवटची गाडी
आताच गेली, पुन्हा रस्तावर आलो, दिसेल त्या गाडीला हाथ करन चालू केल, पण गाडी काही
भेटेना, शेवटी मेढा मार्गे सातारा ला जाणारा मिनी टेम्पो भेटला, रात्री १२ ला
सातारा गाठला. तिथ चौकशी केली तर आता पुढची एष्टी सकाळी ५:३० ची आहे अस कळल, आता
मात्र जीव मेटाकुटीला आला होता, stand मधून बाहेर आलो तर कर्नाटक ची एष्टी दिसली,
पुण्याला जाणार का विचारलं तर स्वारगेट ला जाणार म्हणला किन्नर, आता कुठ हायस
वाटल, २ वाजता तात्री स्वारगेट ला पोहचलो, आता जेवढ तिकीट सातारा पुणे (१२० किमी)
साठी होत तेवढच तिकीट पुढच्या १२ किलोमीटर साठी द्याव लागणार होत, पण इथ पण एक
शक्कल लढवली, zoomcar ची by-cycle चौकातून QR code घेतली आणि अर्धा तासात घर गाठल.
तेही १० रुपयात!
कृष्णाची लीला......अगाध
एकमेव जोडीदार कृष्णा जो नेहमीच भावासारखा सोबत असतो,
नेहमीच मदत करतो त्यान ट्रेक च्या सुरवातीला मस्तपैकी चालत होता, दुसरा दिवस देखील
पठ्याने बिना तक्रार करता ट्रेक चालवला, पण स्वभावाप्रमाणे शेवट जवळ आला कि
भाऊच्या अंगात वर शिरत, लोणावळा ते भीमाशंकर २०१६ दिवाळी ट्रेक मध्ये कृष्णाभाऊने
शेवटची एष्टी चुकवली, रायरेश्वर ते प्रतापगड २०१७ दिवाळी ट्रेक मध्ये भाऊ मधूनच
कलटी मारली,(कारण मीच त्याची जास्तच
चेष्टा मस्करी केलेली, पण मित्राची मस्करी करायची नाही तर कोणाची करायची.), तस यावेळीही
भाऊंच्या मनात तिसऱ्या दिवशी वार शिरलं, (एकदा देवीकड जाऊन वार काढूनच याव लागणार)
पण यावेळी त्याला आधीची सगळी आठवण करून दिली तेव्हा कुठ भाऊ जागेवर आले. पण काही
असो जीवाचा जिवलग आहे, माझ्या अनेक अमुल्य मित्रापैकी अमुल्य भाऊनी ३ दिवस माझ्या order सहन केल्या त्याबद्दल आभारी आहे आणि माफी
सुद्धा मागतो. “तेरे जैसा यार कहा....”
सूचना:
१)
पूर्ण अभ्यास केल्याशिवाय प्रतापगड ते रसाळगड ट्रेक करू नये.(अभ्यास कच्चा
असेल तर गावातून guide घेणे सोयीस्कर ठरेल.)
२)
माझे स्वतःचे २४८ ट्रेक झाल्याने आणि आजूबाजूचा परिसर माहित असल्याने धाडस केल
होत.(तरी जपून प्लान करावा.)
३)
google बाबा चा Map आधीच download करावा.
४)
आम्ही महिपतगड ते सुमारगड ते रसाळगड ४ ते ४:३० तासात पूर्ण केला, जो एक
रेकॉर्ड आहे. वाट सोप्पी आहे फक्त फसवी आहे.
५)
भेटणाऱ्या प्रत्येक माणसाकडून माहिती गोळा करावी.
६)
स्वसंरक्षण साठी एकःदा कोयता, विळा सोबत ठेवावा.
७)
प्रत्येकान किमान २ लिटर पाणी सोबत ठेवाव.(वाटेत पाणी कमी ठिकाणी आहे)
८)
ट्रेक च्या आधी १५ दिवस रोज ४-५ किमी धावणे.
Our plan
executed as :
पहिला दिवस-पुणे ते
प्रतापगड ४० लाखाच्या एश-टी ने, पुढे पायागाडीने प्रतापगड ते कुडपण बुद्रुक,
दुसरा दिवस –पायगाडीने
कुडपण बुद्रुक ते वाडी बेलदार.
दिवस तिसरा – पायगाडीने
वाडी बेलदार ते रसाळगड आणि पुढे ४० लाखाच्या एश-टी ने पुणे via महाबळेश्वर
भविष्यात आम्ही करणार
या पूर्ण ट्रेक वर मार्किंग करणार आहोत, जर तुम्ही चुकला किवा ट्रेक करणार असाल तर (सह्याद्री मधला कोणताही ट्रेक साठी) खाली दिलेल्या mobile
वर call करा, कोणत्याहि डोंगराच्या टोकावर आलात कि range येतेच.
पंकज शकुंतला अनिल माने
७७०९१५९०४४.
pankaj.anil.mane@gmail.com