Thursday, 28 June 2018

कळसुबाई ट्रेक २४ जून २०१८.


कळसुबाई ट्रेक २४ जून २०१८.

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई..... फक्त ८००रुपयात करून दाखवलं..........  ६६ तरुण-तरुणी............. तमिळ अभिनेत्री श्रुष्टी डांगे...... ८ वर्षाचा आदित्य..... आणि त्यावर कहर अवघ्या ४ वर्षाचा तन्मय...... धीरज ने यावेळी मोठी मदत, गावात ३ दिवसापासून light नव्हती....... श्रावणातल्या पावसासारखा रिमझिम पाऊस...... आदित्य, शरीराने जरी गोल असला तरी चढायला पोरग कट्टर होत......उतरताना पायाला आलेली वात..फर्जंद आकाश ने त्याला खांद्यावर घेऊन उतरलेला निम्मा गड....  उतरताना तर खाली पावसाने चिक्कुल केला होता........ गरीबाच्या घरी जेवण केल तर आपल्या पोटामुळ त्यांच्या पोटाला आपला हातभार लागेल हीच आपली इच्छा.

 
भारतातील सर्वोच्च शिखर म्हणजे के२ आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई. या ट्रेक ला कोणालाही मस्का मारायचा नाही हे ठरलं होत, आणि तरीही ६६ तरुण-तरुणी, २ किशोर वयीन आणि, ८ वर्षाचा आदित्य, आणि अवघ्या ४ वर्षाचा तन्मय यापासून सुरवात झाली होती. ऐनवेळी आधल्या दिवशीच ठरवलेली गाडी cancel झाली. ट्रेक ला निघण्याआधीच dsp ला कुत्र चावल, १२ ला येणारी बस १ ला आली. अशी विघ्न येत असतानाच ७० जणांनी ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. कळसुबाई चा ट्रेक म्हणजे कोणतीही commercial संघटना १५०० च्या खाली पैसे घेत नाही, पण रणझुंजार ट्रेकर्स ने फक्त ८००रुपयात करून दाखवलं. कारण यामागे एकच तळमळ होती कि आपला सह्याद्री, आपले किल्ले, आपली माणस त्यापासून तुटत आहेत, त्यांना पुन्हा एकदा सह्याद्रीच्या आणि इतिहासाच्या पानाना जोडणे.

 

 ७० जणांना handel करण म्हणजे तोंडची गोष्ट नव्हती. प्रत्येकाची वेगवेगळी तऱ्हा. धीरज ने यावेळी मोठी मदत केली, त्याच्याकड first-aid-kit पासून सफरचंद, पाण्याचे जार, buiscut, अशी सर्व सोय केली. धीरज म्हणजे complete package आहे. one man आर्मी. जीवनात तो काही बनो किवा न बनो पण माणूस म्हणून great च राहणार. धीरज सोबत सावलीसारखा महेश शब्द पडू देत नसतो. सोबतीला धनंजय (लग्न होऊन सुद्धा..आणि एक पोरग झाल तरी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस..तस खर श्रेय वाहिनीलाच द्यायला पहिजे.) म्हणजे कधीच नाही म्हणणार नाही असा. dsp च्या डोक्यातल्या नवीन कल्पना आणि लहान वयात कमवलेली चांगली दृष्टी (आईच्या दृष्टीत अजूनही बालिश असूनही)..भविष्यातली नेतृत्वाची चुणूक दाखवते. निकेश म्हणजे निर्विकार देवासारखा... कितीही वाईट परीस्थिती असली तरी हसून सामोरा जाणारा, (तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा असतोच म्हणा) माझी अर्धी काळजी निकेश असली कि संपते. आणि आमचा ..ह.भ.प. प्रसाद, भल्याभल्यांना वाकयुध्यात हरवणार character. कळसुबाई उतरताना पायाला आलेली वात मग फर्जंद आकाश ने त्याला खांद्यावर घेऊन उतरलेला निम्मा गड..आता सर्वांचच इथ लिहण सोयीस्कर नाही.. कारण हा ट्रेकिंग चा blog आहे. पण वरील सर्वांनी या ट्रेक मध्ये सावलीसारखी साथ दिली. म्हणून सर्वात आधी त्यांचे आभार.  


 

आमच्या दोन्ही गाड्या हळूहळू आणि खूप लांबच्या पल्ल्याने बारी गावात पोहचल्या. गावात ३ दिवसापासून light नव्हती. पाऊस पडला कि अस नित्यनियमाने होतंच. त्यांचे कष्ट फार मोठे आहेत. आपल्याला ५ मिनिट light नसली कि कस तरी होत. थोड्या वेळात फ्रेश होऊन चहा, नाश्ता करून कळसुबाई कड निघालो. शेतातून जाणारी वाट लगेच सिमेंट च्या पायऱ्यापर्यंत पोहचवते. पायऱ्या चढल्या कि थोड सपाट पठार मग पुन्हा छोटा चढ मग आपण मिनी कळसुबाई ला पोहचतो. ज्यांना कळसुबाई पूर्ण करता येन शक्य नसत त्यांनी इथूनच प्रती-कळसुबाईच दर्शन घेऊन माघारी निघावं. प्रत्येक ५/१० मिनिटानंतर हॉटेल ची जंत्री होतीच. सकाळी ९:३० ला निघालेली आमची टीम १:३० वाजता top वर होतो. सुरवातीला पाऊस नव्हताच. पण हळू हळू शिडकावा चालू झाला मग पुन्हा उतरेपर्यंत पावसाने साथ सोडली नाही. श्रावणातल्या पावसासारखा रिमझिम पाऊस. सुखद.... एकूण ४ शिड्या लागतात, पहिल्यांदा येणाऱ्याला स्वर्गाचा रस्ता सुद्धा त्यात दिसतोच दिसतो. तरीही आदित्य (८ वर्षाच प्वार) न थकता एका दमात चढत होत.( शरीराने जरी गोल असला तरी चढायला पोरग कट्टर होत). आदित्य कळसुबाई वरून उतरत असताना वर जाणार्या प्रत्येकाला प्रोत्साहन देत होता.( तुझ्यापेक्षा बारका असून पण चढलो मी..थोड राहीलय ..... अस करत चिडवत होता.) (धीरज चा मामे भाऊ असल्याने त्याचे सगळेच चाबरे गुण घेतले होते..आणि त्यात खुळेवाडीत राहणारा..मग तर नादच करायचा नाही). वर पोहचल्यावर अशी हवा सुटली होती कि सांगायलाच नको. (जाऊदे सांगतच नाही!) ताशी १२० चा स्पीड! एका कोपर्यावर तर २०० चा स्पीड क्रॉस केला असेल. ४ वर्षाचा तन्मय जिद्दीने चढ चढत होता. त्याचे आई-बाबा थकले पण तो काही थकेना, शेवटी पावसाच्या नावाखाली त्याला अर्ध्यावरच थांबायला  लागल.

कळसुबाई उतरताना शुभमच्या ( वयाने लहान असताना सुद्धा मोठे फोटोग्राफर म्हणून नाव कमावलेले) पायाला आली वात....(.मग पेटवायची का वात पासून ते कुठ काडी लावू असे जोक्स मारत पण सोबतच मदत करत) सर्व खाली उतरलो. मग फर्जंद आकाश ने त्याला खांद्यावर घेऊन उतरलेला निम्मा गड, त्यानंतर dsp ने त्याला साथ दिली.  तिथ थांबायला daring लागत. उतरताना तर खाली पावसाने चिक्कुल केला होता. १०/२० जन तर माझ्या नजरेत धपकन घसरून पडले असतील... या पडण्याची पण एक मज्जा असते.. हसायला येत फक्त..कारण पडल तर लागत नसत.. बरोबर वाट करत तो आपोआप खाली पडलेला असतो. अस पडत झडत आम्ही ४ वाजता खाली पोहचलो आणि तिथच माणिक (९११२८३०२१२) नावाच्या एका गरीबाच्या घरी order दिल्याप्रमाणे पोटभर जेवलो. हॉटेल पेक्षा अस गावातच गरीबाच्या घरी जेवण केल तर आपल्या पोटामुळ त्यांच्या पोटाला आपला हातभार लागेल हीच आपली इच्छा.

 

ट्रेक मध्ये तमिळ अभिनेत्री श्रुष्टी डांगे (आपल्या राकेश ची सख्खी मावस बहिण) या देखील सोबत होत्या. तमिळ जगात त्यांचे खूप fan आहेत. त्यांना जास्त त्रास मुद्दामच दिला नाही कारण celebraty ला celebrity म्हणून नुसत्याच सेल्फ्या काढण्यापेक्षा त्यांनाही normal माणसासारख राहू देन महत्वाच असत. त्यांचही इथ नमूद करण्यासारखं म्हणजे माझी अपेक्षा होती कि त्या थकतील पण छे! कधीच न थकता...सोबतच्या त्यांच्या जवळच्या मैत्रीण साठी नेहमी support करत चढत होत्या. सुंदरता आणि धाडस दोन्ही एकत्र नांदत होत. राकेश शेठ मुळ त्या मुंबई वरून ट्रेक साठी आल्या, आणि ट्रेक संपला कि लगेच मुंबई गाठली. कष्ट सर्वाना असतात... उगाचच एवढ्या स्पर्धेच्या जगात कोणी तग धरून राहू शकतात का?


सर्वात महत्वाच म्हणजे ७० जणांनी काही कुरबुर न करता आमच्यासोबत येन. मी तुमचेही धन्यवाद मानतो. असच सोबत येत जा....दरवेळी नवी दुनिया आम्ही नक्कीच दाखवू.

आपलाच भटका,

पंकज,

रणझुंजार ट्रेकर्स (७७०९१५९०४४).


Thursday, 14 June 2018

लोणावळा ते भीमाशंकर ट्रेक, lonawala to bhimashankar trek


लोणावळा ते भीमाशंकर trek 

,,,७ नोव्हेंबर २०१६




दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आम्ही दिवाळीची grand trek काढली, गेल्या वर्षी आम्ही तोरणा ते रायगड trek केली होता. यावर्षी लोणावळा ते भीमाशंकरचा बेत ठरला आणि कृष्णा, मंगेश, संकेत सिद्धांत आणि मी (पंकज) पाच पांडवाप्रमाणे आम्ही निघालो, या वाटेत बिबट्याचे भास, बिबट्याच्या बछडयाचे भीतीयुक्त आवाज, सावली सारखी सोबत असणारी रानडुकराची जमिनीवरील खणलेली चिन्हे, ४ वेळा वेगवेगळ्या प्रकारचे साप समोरून जाताना अमृतासारखी वाटणारी धोपट वाट धुंडाळत, २ वेळा शेकारुच झालेलं दर्शन, राजमाचीच्या तळ्यात मारलेल्या उड्या, वाटाड्या म्हणून दिवसभर सोबत करणारी रंगीबेरंगी फुलपाखर, असंख्य फुलांचे ताटवे, ३ दिवसात २ वेळा वाट भरकटणे, वरचा सगळा अनुभव म्हणजे दुधात नुसतीच साखर नाही तर दुधात केशर,बदाम,पिस्ता आणि गुलाबी रंग टाकून दिल्यावर जस मनात गुदगुल्या होतात तस झाल होत.          

तर सुरवात झाली ४ नोव्हेंबर ला रात्री १२:०० ला पुणे स्टेशन वरून आमची पुणे-लोणावळा लोकल पकडून ५ नोव्हेंबरला रात्री १:३० ला उतरलो आणि शिवाजी महाराजांचे नामस्मरण करत तुंगार्ली मार्गे राजमाची कडे निघालो. वाटेतच जाताना सिद्धांतला झाडाशेजारून गुरगुरण्याचा आवाज आला, अचानक सिद्धांतने रस्याच्या एका बाजूकडून दूसरीकड आम्हाला ढकलल, काही कळाल नाही, त्या बाजूला दुरूनच torch मारल्या तर काहीच दिसलं नाही, नक्कीच भास नव्हतातिथ एकतर नाग/जनावर असावा किंवा खरच बिबट्या असावा म्हणून safety म्हणून पुढच्या धनगरवाडीत रात्री अडीच वाजता एका खुल्या gym मध्ये दीड तास पडी मारून पहाटे ४ वाजता पुन्हा आमची पायगाडी निघालो. एक गम्मत मात्र होती कि राजमाची कडे जाताना नेहमी धनगरवाडी मधली कुत्री आम्ही चोर असल्यासारखं रस्ता अडवत होती पण पहिल्यांदाच इतक्या भयानक थंडीत ती पाहून पण न पाहता केल्यासारख करत अगदी मानही वर न घेण्याची तसदी न घेता मुक्या डोळ्यांनी पुन्हा झोपी गेली. बेसुमार फोटोग्राफी करत सकाळी ९ वाजता आम्ही राजमाची पायथा म्हणजेच उधेवाडीला पोहोचलो.

 


मनोरंजन पाहून झाल्यावर तळ्यात उड्या मारून दुपारी अंघोळ केली, शहरातल्या क्लोरीन च्या watertank मधल्या पाण्यात पोहण्यापेक्षा मस्त नैसर्गिक तलावात अंघोळ करन म्हणजे जणू स्वर्गसुखाच लेणच.



तस नियोजनाप्रमाण आजचा मुक्काम राजमाची होता पण कृष्णा (माझा सख्खा मित्र) ला त्याच्या  महिन्याच्या मुलाची हुरहूर लागली असल्याने मुक्काम पुढच्या गावात करायचा ठरवलं, दुपारी तिथच तळ्याशेजारी स्वयपाक करून मस्त दिवाळी फराळासोबत केलेला मसालेभात खाऊन १ तासाची पुणेरी वामकुक्षी केली. मग ४ वाजता निघालो वळवंड गावाकडे, पहिल्यादा वाट चुकूनहि बरोबर जात वळवंड ५ ला गाठलेवळवंडला पोहचल्यावर एका माणसाकडून वाट विचारून आम्ही कोंडेश्वर मंदिराकड निघालो त्या माणसाने अर्ध्या तासात पोहचेन अस सांगितलं होत पण एक तास होऊन पण मंदिराचा पत्ता लागत नव्हता आणि अचानक समोरच ढाकच्या बहिरीन दर्शन दिल. ढाकच दर्शन घेतल्यानंतर जीवात जीव आला होता कारण आम्हाला आता नव्या शत्रूचा सामना करत वाट शोधायची होती अंधार पडतच होता आणि एका डोंगराच्या पलिकड कोंडेश्वरच मंदीर  दिसलं पण खाली उतरायची वाट आम्ही हरवून बसलो पुन्हा थोडस माघारी वळलो पण जिकडून खाली जायची वाट दिसत होती ती थेट ओढ्याच्या मार्गे कड्यावरून खाली जात होती, जर आम्ही पाणी असतो किंवा पक्षी असतो तर नक्कीच या मार्गाने खाली गेलो असतो पण सुदैवाने(पण आता दुर्दैवाने) माणूस असल्याने तिथून उतरणं आम्हाला शक्य नव्हत . एव्हाना सात वाजून गेले होते, टोर्च होत्या पण घनदाट जंगल सोबत होत आणि जागोजागी सापाची बिळ आणि रानडुकराची खुणा असलेली माती होती. कोंडेश्वर मंदिर दिसत होत आणि खाली लोकही होती. आता शेवटचा पर्याय म्हणून मदतीसाठी खाली आवाज दिले १०-१५ मिनिटे आवाज दिल्यावर खालून कोणीतरी प्रतिसाद दिला, ते म्हणत होते डावीकड ओढ्यातून उतारा पण त्यांना सांगून सांगून आम्ही कंटाळलो कि डावीकड ओढा आहे आणि त्या ओढ्यातून खाली फक्त पाणीच जात पण त्याचं एकच वाक्य होत शेवटी आम्हीच म्हणालो कि तुम्ही थोड वाट दाखवायला वर या मग ते येतो म्हणून आमच्या डावीकड आले मग आम्ही पण ठरवलं कि चला आता फक्त खालीच उतरू मग आता दरी पण चालेल पण अस वरती डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही अशा अंधारात नाही राहायचं. मग अजून डाव्या बाजूकड गेलो परत ओढ्याची वाट होती तरी थोड तिरक पुढ जाऊन खाली कधी कोणी गेलाच नसेल अशा वाटेतून खाली गेलो. जाताना किती वेळा ठेचकाळलो ते माहिती नाही पण ध्येयासमोर (डोंगरावरच्या जंगली भितीमूळ) सगळ फिक्क ठरवत आम्ही उतरलो. खाली घ्यायला आले होते तीन जन आणि त्यांच्यासोबत होती बेसबॉलची स्टिक, कोयतेते स्वत कुटुंबकाबिल्यासह आल्यामुळ हि जय्यत तयारी होती, खूप खूप आभार मानले खूप चांगली माणस होती ती मग कळाल कि ते अजित जाधव(स्वाभिमानी संघटनेचे पुण्याचे अध्यक्ष) होते.कोन्ढेश्वर मंदिराच्या वरती अजून एक मंदिर आहे तिथ मुक्कामासाठी थांबलो, चूल पेटवून भात-वरण-फरसाण खाल्ला आणि रात्री अकरा ला झोपलो, इतकी गाढ झोप लागली कि सकाळी सातलाच जाग आली मग मस्त सठर-फटर खाऊन निघालो ढाकच्या बहिरीकडेआधी ढाकच्या बहिरी ला भेट दिली होती, खूप कठीण वाटला होता. बहिरीच्या पोटातून वर चढताना नवख्याच्या पोटात गोळा येणार हे नक्की असत. आम्हाला ढाकच्या बहिरीच विना गर्दीच दर्शन झाल (चमत्कारच) कारण नेहमी खिंडीत आणि लाकडाच्या फांदीवरून जायला वन वे सारख traffic लागत. माणूस एकटा चढण जड जात पण इथ दुरून दुरून गावकरी कोकरू घेऊन वर चढत होते. बहिरी देवी तांत्रिक मानली जाते कारण कोकरूचा बळी आणि अंगात येण हा प्रकार येथ सर्रास चालतोढाक उतरताना खाली पाहू वाटत नाही पण खाली न पाहता  पाय ठेवण्याची चूक कोणीच करू शकत नाही, जीव मुठीत घेऊन उतरणं म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर ढाकचा बहिर्री एकदा पहिलाच पाहिजे. ढाकचा बहिरी पाहून झाल परत खिंड चढून वर आलो आणि आता सुरवात होती कुसूर गाव शोधण्याची .......

बऱ्याच लोकांना कुसूर ची वाट विचारली पण नक्की वाट कुणालाच सांगता येत नव्हती शेवटी अजून एकदा चुकून ढाक गावात जाता जाता वाचलो कारण चुकाण्याआधी जिओच्या कार्ड ला रेंज आली (अंबानीची कृपा) आणि कुसूर गावची वाट एका पठारावरून जाताना दिसली मग निघालो आणि भीमाशंकरचा फाटा फुटणारी वाट दिसली एक बोर्ड पण दिसला, धन्य-धन्य झाल, थोड चढून पुढ आलो तर कुसूरच विस्तीर्ण पठार लागल, पठारावर जागोजागी JCB ने केलेले खड्डे दिसले (आमच्या तोंडात बोटेच !!), जिथ माणसाला वर यायला अवघड तिथ JCB आलच कसा? कुठतरी वाचल होत कि एक tower दिसतो आणि तिथच धनागारापाडा आहे, त्या दिशेला निघालो पण मूळ वाटच JCB नावाच्या अजस्त्र जनावरान उखडून टाकली होती(नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न), पण भटकून चुकवायच्या दहा वर्षाचा अनुभव पणास लावत बरोबर वाटेवर निघालोमध्येच आमच पाणी संपल होत आणि JCB च्या आवाजाकड जात असताना दोन मानस आमच्याकड येत होती, मग कळाल कि JCB वरती येण्यासाठी JCB ने स्वतः वाट करत दोन दिवस लागले होते. (माणसाला चढून यायला २ तास) त्यांच्याकडून उसन पाणी घेतलं आणि थोडी न्याहरी केली त्या माणसापाशी चौकशी केली तर त्यांना काही माहित नव्हत ते विजापूर (कर्नाटक) येथून पाणी अडवा पाणी जिरवा कामासाठी(पोटाची खळगीसाठी) आले होते (चारशे रुपयात दिवस). परत चुकत चुकत धनागारापाडा गाठला. घरात एक माउली आणि दोन मुली (मराठी माणसाच मावळी धाडसच)  माउलीने ताक दिल आम्ही पुन्हा चूल पेटवली आजच जेवण रद्द झाल होतच दुपारचे ४ वाजत होते म्हणून maggie केली खाऊन निघालो आम्ही कुसूर गावाकड, २० मिनिटात धावतच कुसूर गाव गाठल (जवानीचा जोश), २ दिवसातून प्रथमच डांबरी रस्ता दिसला होता म्हणून सर्व डांबरी रस्त्यावर आनंदाच्या भरात नाचलो. जिथ पुढ चालू कि नाही याची शाश्वती नव्हती तिथ आम्ही नाचलो याच हसूच येण्यासारखं होत ते! 



कुसूर पासून सावळा गाव अंतर डांबरी रस्त्याने १५ किलोमीटरच होत डोंगरी रस्ताच नव्हता, निघालो मग कुसूर-खांडी-सावळा गाव अंतर रखडत रखडत पार केल मध्येच एका ट्रक्टर ने एक किमी ची लिफ्ट दिली, अंधार पडला होता पण डांबरी रस्ता होता म्हणून निवांत निघालो. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सावळा गाव गाठल. सावळा गाव प्रसिद्ध आहे तो म्हणजे वाटाड्यासाठी(जो तो हेच विचारात होता कि guide पाहिजे का?) पहिल्यांदाच असा अनुभव होता कि खूप लोक जवळ येऊन काय पाहिजे ते विचारात होते, माणसे चांगली होती पण त्यातले काही लोक पैशासाठीच जवळीक साधत होते पण आमचा बाणा मंदिरात राहायचा आहे कळल्यावर मग थोड त्यांनी माघार घेतली, आम्ही तरी साडेदहा ला जेवलो, आजचा बेत होता अंडे, बटाट्याची भाजी, भात. सावळ्या गावात एका मंदिरात झोपण्याची सोय झाली. सकाळी उठून परत लोकांनी विचारलं आणि सांगितलं कि तुम्हाला वाटाड्या लागेलच नाहीतर वाट चुकणार (त्यांना कोण सांगणार आम्ही वाट चुकण्यात आणि परत शोधण्यात ph.d केलीय), तर सावळ्यातून समोर गेल्यावर एक फाटा फुटतो तिथून निघालो, जाताना खतरनाक जंगल लागल बऱ्याच लोकांनी सांगितलं कि तुम्हाला आधी पढरवाडी लागेल मग वांद्रे गावातून भीमाशंकरला जाता येत, आता पुन्हा वाट चुकलो भरकटलो शेवटी हो नाही करत एका खिंडीपाशी निघालो कारण पायवाट तिकडच चालली होती आणि परत फिरून रस्ता शोधण्याची ऐपत नव्हती, एका ठिकाणी किर्र जंगल लागल आणि एका मांजरासाखा आवाज आला मग अजून पुढ गेल्यावर तो बदकाचा आवाज वाटला मग जस जवळ जाऊ तस बिबट्याच्या पिल्लाच्या आवाजाची खात्री झाली  मग काय ? मग काय? माघार घ्याय्चीनही हे ठरल होतच. आमच्याकड प्रतिकाराच एकमेव साधन म्हणजे कांदा कापायचा चाकू होता तो माझ्याकड आला (कारण मी सर्वात पुढ होतो) आणि बाकीच्याकड लाकड, अजव १०-२० फुटावरून आणि स्पष्ट ऐकू येत होता थोडस उजव्या बाजूला खाली पाण्याच्या तिथून त्या बिबट्याच्या पिल्लाला आमची चाहूल लागल्यामुळ आईसाठी ओरडत होत. सगळ्यांच्याच अंगाला घाम फुटला होता तरीही या जन्मात बिबट्या आमने-सामने दिसणार म्हणून मनातून आनंद होत होता. वाट भूलभुलैया सारखी वाकडी-तिकडी असल्याने आता आवाज उजव्या बाजूकडून येत होता आणि हळूहळू आवाज मागे पडला, आता जवळपास आम्ही एका खिंडीच्या मधोमध आलो होतो खिंडीच्या दोन्ही बाजूला पावन्चाक्क्याचे tower होते, पुढ माहित नव्हत कि वाट या पवनचक्की कड जाते कि भटकून जंगलात सोडते पण खिंड ओलांडल्यावर घर दिसू लागली खळ्यात काम करणारी माणस दिसली, गाव कोणत होत माहित नव्हत म्हणून खाली माणसाकड धावायला सुरवात केली, आमच्याकड टकामका बघत ते विचारपूस झाली आणि स्वताहून एक जन पाणी घेऊन आला आम्ही वाट विचारली तर आमचा कॉन्फिडन्स कमी करत त्याने बिबट्याची भीती आणि कालच असा ग्रुप भटकून परत भूलभुलैया सारख परत आला सांगत वाटाड्या नसाल तर जंगलात फसाल सांगून गुगली टाकली, वाटाड्या घेऊन जाणार तर अख्ख्या ट्रेकिंग आयुष्यात अपमानासारख वाटत होत आणि सुमारे बाराशे रुपयाच्या खाली स्वारी येईच ना. 

मग ठरत कि काय होईल ते होईन आपण जाऊनच दाखवायचं, मग दुपारी एका माऊलीच्या (आजी) घरात परत maggi करून खाल्ली कारण चूल पेटवायचा वेळ वाचवायचा होता. त्या आज्जी ने सांगितलं कि रस्ता सरळ आहे तुम्ही एवढ्या लांबून आलात तर जावा सरळ सापडेन वाट तुम्हाला मग निघालो आम्ही पढरवाडीतून नदी पार केली कि छोटी टेकडी लागते आणि त्या त्यावर एक चांगला गाडीरस्ता लागतो जो कि वांद्रे गावातून येतो मग उजविकड गेल कि एक डोंगर दिसतो त्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो कि एक रस्ता भीमाशंकर कड जातो तसा रस्ता गाडीरस्ता आहे आरामात पंधरा मिनिटात आपण एका बांधकामाजवळ पोहोचतो पढरवाडीतल्या एका आजोबांनी सांगितलं होत कि त्या इमारती पासून  उजवीकडे गेल कि एक साधी पायवाट भीमाशंकरला जाते मुख्य गाडीरस्ता सोडून द्यायचा आणि आम्ही अगदी आज कुठेच न चुकता तंतोतंत त्या वाटेने पुढ सरकलो, इमारतीपासून भीमाशंकरच नागफणी आणि पदरगड स्पष्ट दिसत होत, या इमारतीपासून उजवीकड वळून पुढ गेल कि दोन रस्ते लागतात एक रस्ता पायवाट आणि एक गाडीवाट इथून पायवाट पकडून थोडा किंचित उतार लागतो अस वाटत आपण विरुद्ध दिशेने जातोय आणि खाली दरीत उतरतोय पण तोच रस्ता बरोबर होता मग थोड पुढ गेल कि कळतो आपण न चुकता एकदम हायवेने(बरोबर रस्त्याने) आलोय, येथून पुढ फक्त सोबत होती केवळ फुलपाखर आणि साप आणि निसर्याच सौंदर्यमध्येच संकेतचा बूट खाऊन सोलून निघाला होता आणि जवळजवळ मोजा जमिनीला घासत होता मग आम्ही बुटामध्ये झाडाच्या पानाची लादी ठेवली (नैसर्गिक उपचार) दोन तास चालल्यावर एक विस्तीर्ण पठार लागत भटक्याची शंभर टक्के खात्री असणार हे पठार आहे, कासच्या पठाराला तोडीस तोड असणार आणि फक्त गाडी येथपर्यंत येन न शकल्याने कायम दुर्लक्षित असणार विविध रंगाची दगडावरची फुल आणि त्यावर राज्य करणारी फुलपाखर पाहून मनाचाच काय शरीराचा पण थकवा दूर होतो, या पठारावरून स्पष्ट नागफणीच टोक दिसत



पठारावरून आम्ही जाताना एका ठिकाणी एक किशोरवयीन मुलगा दिसला, वर्षातून पहिल्यांदा माणूस भेटावा तसा आम्हाला वाटला कारण गेल्या चार तासापासून एकहि माणूस दिसला नव्हता आणि अशा पठारावर हा मुलगा बसलेला एकटाच, त्याला विचारलं तर सगळी उडवाउडवीची उत्तरे दिली एकदा म्हणाला खूप लांबून आलोय आणि काहीच expression न देता परत म्हणला कि जवळच राहतो, ज्यात चप्पलही नव्हती नीट लक्ष देऊन इकड तिकड बघितलं तर अजून तीन जन दिसली पण ती जवळच एका गचपणात बसली होती तरुणच होती पण खूप घाबरलेले दिसत होते काहीतरी गुन्हा करून इकड लपायला आले आहेत अस वाटण्यासारखी स्तिथी होती कारण त्याला भीमाशंकरचा रस्ता विचारला तर त्यान भलत्याच दिशेला हात दाखवला आणि त्याच्यासोबत बोरा-बिस्तरा होता आणि लांबूनच ती तिघ आम्हाला निरखून पाहत होती मग आम्हीच तिथून काढता पाय घेतला आणि पुढ निघालो तर एकदा चुकलो मग नीट शोधून वाट सापडली पठाराच्या उजव्या भागास कमळजाई देवीच मंदिर आहे. हे मंदिर भीमाशंकर कड जाताना उजव्या बाजूला लागत आणि इथूनच भीमा नदीची घळई दिसते, किती काटेकोर पणे पाण्याने केलेली भिमेची वळणावळण्याची कलाकृती पहायची असेल तर या ठिकाणी यावच लागेलकमळजाई देवीला बाहेरूनच दंडवत घालून पुढ भीमेच पात्र पाहत निघालो. आमची वाट पायवाट होती तर उजव्या हाताला खोल भिमेची घळ होती आणि घळीच्या दुसऱ्याबाजूवरुन एक मोठी मातीची गाडीवाट होती, आणि संध्याकाळ होत होती भीमाशंकरवरून येळवणी (हा मार्ग म्हणजे भोरगिरी ते भीमाशंकर चा ट्रेक) गावात रोजची ये-जा करणारी माणस भेटली, खूप बर वाटत होत कारण सगळ्याच्या अंदाजाप्रमाणे अर्ध्या-एक तासात आम्ही भीमाशंकर ला पोहचणार होतो. जाताना किर्र जंगलात शेकरून(जगाच्या पाठीवर फक्त याच ठिकाणी असणारा) दर्शन दिल. आणि एका दमात आम्ही भारतातल्या बारा जोतीर्लीन्गापैकी एका जोतिर्लिंगाजवळ पोहोचलो. खूप थकवा आला होता पण इथ पोहचताच सर्व थकवा गायब झाला, उड्या मारून आनंद साजरा करावा अस वाटत होत. खिशातल्या device वर अंतर मोजल तर ते जवळपास बाहात्तर किमी(७२km) भरलं होत, डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता पण सत्य होत, तीन दिवस पूर्ण चालण चालूनही आम्ही भीमाशंकरच्या २०० पायऱ्या आपसात स्पर्धा लावून धावून गेलो, कोण पाहिल आल हे महत्वाच नव्हत पण अजून पायात एवढा दम होता कि रिटर्न परत लोणावळा जाऊ शकत होतो    



अशाप्रकारे निधड्या छातीने तंगडतोड trek करत आम्ही तीन पूर्ण दिवस आणि ३ पूर्ण रात्रीचा प्रवास संपवला. खालून बूट फाटलेला असतानाही कधीच कुरबुर न करता संकेत, मी सांगेन ते काम नेहमी ऐकणारा सिद्धांत, बाळाची(तान्ह्या) काळजी मनात न दडवता trek अर्धवट न सोडता पूर्ण करणारा कृष्णा, स्वतःची पाठीवरची sack फाटली असताहि दोन बंदाच्या पिशवीत पूर्ण trek करणारा मंगेश, आणि ज्याच्या शब्दावर विश्वास ठेऊन मी म्हणेल त्या वाटेने येणारे, माझ्या आदेशांना मनावर न घेता निमुटपणे (कधी कधी न जुमानणारे) हे चौघे असा आमचा पाच जणांचा रणझुंझार trekkers चा अतिशय रसरशीत trek पूर्ण झाला.    

आपलाच 

पंकज माने ७७०९१५९०४४ (भटका ......रणझुंजार trekkers)

pankajamane@gmail.com

ढाकच्या बहिरीवर चढताना घड्याळ काढल पाहिजे होत..

background image dhakcha bahiri

dhakcha bahiri climbing mangesh, krushna, sidhu, dsp.
dhakcha bahiri

२ मिनिट बसा म्हणल कि पथारी पसरून झोपणारे कार्यकर्ते...

२ मिनिट बसा म्हणल कि पथारी पसरून झोपणारे कार्यकर्ते...भर उन्हात सुद्धा

साप क्रमांक २

कुसूर पठार

आजचा फराळ ...maggie maggie ani maggie