Monday, 11 June 2018


कलावंतीनिंचा बुरुज - प्रबळगड १९ फेब्रुवारी २०१८ शिवजयंती
 
 
 
 सरकारी तिथीप्रमाणे येणारी शिवजयंती म्हणजे १९ फेब्रुवारी. तस तर शिवजयंती कधी याचा घोळच आहे म्हणा, तारीख प्रमाणे आणि तिथी प्रमाणे (तस आपल्याला कोणतीही चालते), पण एक प्रश्न येतो कि जे लोक तिथीप्रमाणे म्हणजेच मराठी महिन्याप्रमाण शिवजयंती साजरी करतात ते स्वताचा वाढदिवस (जयंती..!) तसाच मराठी महिन्याच्या तिथीप्रमाणे करतात का ? (जरा करा विचार)

असो, यावेळी शिवजयंती चा मुहूर्त साधून दुनियाका सबसे खतरनाक किला( youtube वर प्रसिद्ध) आणि dangerous trek म्हणून प्रसिद्ध असलेला, पण तस काही नसून एक सहज सोप्पा बुरुज आहे ज्याच्या सुंदर अशा कोरीव पायऱ्या आहेत. या पायऱ्या म्हणजे त्याकाळी सुद्धा सुपीक डोक्याचे engineers होते (आजच्या engineer ना तोडीस तोड) याचा उत्तम असा नमुना आहे.

वर्षाआधी ट्रेक ठरवताना खूप अर्जवा, विनंत्या, मिनत्या करून (अगदी अंगात नसलेलं marketing च skill लावून) 8 दिवस आधी सांगून पण 25/30 जण येणार अस म्हणणार मग त्यातले अर्धे जण आधल्या दिवशी अर्रर विसरलोच उद्या काम आहे म्हणून दांडी मारणार, 2/3 जण त्या आई सोडत नाही म्हणणार (आश्चर्य म्हणजे वयाची 21 वर्ष पूर्ण झाली तरी......) 2 जण तरी त्या दिवशीच येऊ का नको अस संभ्रमात राहून आमचा जीव खाली वर करणारे , एखादा अचानक येणार... अस असायचं ...चालयच.... मग गाडीच नियोजन... मग जेवायचं नियोजन....अस हत्तीसारख असायचं. पण आता काळ बदलला आहे. रणझुंजार trekkers च नाव अवघ्या पुण्यात गाजत आहे.

नवनवीन तरुणांना आम्ही केलेले गड किल्ले पुन्हा पहायची इच्छा असते. मग काय आता नाही कराव लागत अर्जवा, विनंत्या. एकदाच विचारायचं ..आले तर आले.....नाहीतर नाही. तरीही यावेळी 14 जण आले.

संध्याकाळी १०:३० ला निघालेली आमची गाडी सर्वाना घेत घेत मुंबई रोड वर लागली. गाडीमध्येच फुल sound सोडून dance चालू झाला होता. सगळेच जण आनंद घेत होती. जागा कमी असून पण dance करण्यात माहीर असणारे प्रदीप मास्तर (उर्फ मास्तर ...उर्फ गरिबांचे ह्रितिक रोशन), माही, विशाल, संकेत, सिद्धांत, प्रतिक आणि ऋषभ (उर्फ गरिबांचे स्वप्नील जोशी)असे पनवेल येईपर्यंत नाचतच होते. मास्तरांनी आणि संकेतने (उर्फ गरिबांचे अमिताभ बच्चन आणि हो dsp या स्वयंघोषित नावाने प्रसिद्ध असणारे....पण बाबा नसणारे) वेगवेगळ्या आवाजाचे नमुने दाखवल्यावर driver साहेबांचे पोट दुखायला लागले होते...आदिवासी लोककलेचे सगळे आवाज मास्तरांना जमतात. रात्री २:३० वाजता ठाकूरवाडी मध्ये पोहोचलो.

गावन कात टाकली आहे. बर्यापैकी सुबत्ता आणि आर्थिक विकास होत आहे. पोहोचलो तस चढायला सुरवात केली. रवि सरानी (उर्फ रुबाबदार व्यक्तिमत्व असणारे उर्फ गरिबांचे अनुपम खेर) नवनवीन गाण्यांचे रंग चढवले. सर म्हणजे एक वेगळच रसायन आहे, अर्ध्या मिनटात गाण तयार करणार आणि पाव मिनटात नवीन चाल लावून गाण बाहेर पडणार.....प्रदीप मास्तर आणि रवि सर यांची जोडी म्हणजे.....अस्सल गावरान तडका कॉमेडी ...हे दोघ जिथ जातील तिथ चला हवा येऊ द्या चा सेट तयार करतील.....मग तासातच खिंडीत दाखल झालो. आता गावात थांबून आराम करण्यापेक्षा बुरुज पहाटेच चढायला घेतला. माझ्याशिवाय आधी कोणीच बुरुज पहिला नव्हता म्हणून .... सर्वांच्या मनात धाकधूक होती. हळूहळू सुरवात केली, आणि काहीच मिनटात माथ्यापर्यंत पोहोचलो. शेवटचा टप्पा जरा अवघडच आहे. तशी रस्श्शी बांधलेली आहे म्हणून काळजी करण्याच काही कारण नाही. सर्वाना सुखरूप घेऊन वर चढण झाल. सकाळचे ४;३० वाजले होते. म्हणून थोड्या वेळ आरामाच मनावर घेतलं आणि झोपेला मिठीत घेऊन पडलो.






काही उत्सुक कार्यकर्ते एवढ्या सकाळी सुद्धा फोटो काढून घ्यायचा आनंद घेत होते. भल्या सकाळीच रवि सरांनी भाषण द्यायला चालू केल, हसवून हसवून सर्वाना जाग केल. आज सूर्यदर्शन थोड उशिरा दिसणार होत कारण सूर्य प्रबळगडच्या मागच्या बाजूने येणार होता. तोपर्यंत सर्वाना सांगितल्याप्रमाणे सर्वांनी पांढऱ्या रंगाचे पोशाख परिधान केले (दोन ओंजळ पाण्यात चेहरा धुऊन तयार...शेवटच्या काहीजणांना अर्धा ग्राम पाण्यातच समाधान कराव लागल), संकेतने ने घोषणा देऊन सकाळ शिवमय केली. किल्लावर आमचा आणि आमचाच आवाज होता. आता परतीचा प्रवास चालू झाला होता. थोड्याच वेळात खिंडीत दाखल झालो. खिंडीपर्यंत उतरताना महेंद्र (उर्फ माही.. उर्फ गरिबांचे chocklate-boy म्हणून प्रसिद्ध असणारे) म्हणालाच कि रात्रीच चढलो ते बर झाल नाहीतर सकाळी बघूनच चढलो नसतो. खिंडीतच शिदोरी सोडली.... चपाती, शेंगा-चटणी, आम्रखंड, गाजर, काकडी आणि सोबतीला उबदार हवा खाऊन खाली उतरायला चालू झाल.

आड 
एव्हाना सकाळचे 9 वाजले होते. खाली गावात जाऊन लिंबू-सरबत तयार करून प्यायचा plan होता. पण सिद्धांत (उर्फ सिद्धू.. उर्फ गरिबाचे handsome-boy) यांच्यामुळ चुकामुक होऊन गडबड झाली. आणि आमचा विक्रम (उर्फ विकी .....उर्फ गरिबांचे शहीद पकुर) हरवले. गावात नवीन झालेली विहीर अप्रतिम आहे पण गाळ बर्यापैकी वर असल्याने नवीन पोरांना पाणी बघूनच सरबत नको वाटल...मग विकी ला शोधात आम्ही निघालो खाली. विकी पण सापडला ....मग तिथ ठरलं कि मुलीनंमूळ उशीर होणार उतरायला म्हणून मुली आधी १० पाऊले पुढे निघतील मग मागे सगळे ..अस म्हणताच दिपाली ( उर्फ दीपालीच..उर्फ गरिबांची श्रुती हसन) पळतच खाली निघाली, मला वाटल कि हि जास्तीत जास्त १० मिनटे चालेल मग मागचं पडणार पण आज शिवजयंतीला तिच्यात जोश शिवाच भूत आल होत. अशी हि रणरागिणी पुढ पुढ राहत होती. शेवटपर्यंत ती पुढच राहिली( या पुढ राहण्याच्या शर्यतीमध्ये एकदा ती घसरून सुद्धा पडली..फुफुट्यात पडली...तरीही पुढच राहायचं या इर्षेपोटी लगेच उठून कपडे सुद्धा न झाडता तुरुतुरु (मास्तरांच्या भाषेत) निघाली). आम्ही ११ वाजता सकाळी खाली पोहोचलो होतो.

मग उरलेली सर्व येईपर्यंत आराम केला..११:३० वाजता गाडीत बसून धरणाकड कूच केली आता गरज होती कुठतरी डुबण्याची...झोकून द्यायची...मोरबे धरण जे कि चौक (कर्जत फाट्याजवळ) आहे तिथ पोहोचलो. थोडी मस्ती केली आणि करू दिली. आज दिवसच शिवमय होता. शिवाजी राजांनी जी ज्योत पेटवली आहे विचारांची ती अशीच पुढ चालू राहणार. जय शिवराय 
आपलाच भटका,
पंकज.
(रणझुंजार ट्रेकर्स, पुणे)
(७७०९१५९०४४)   


 















 

No comments:

Post a Comment