Monday, 11 June 2018

तोरणा किल्ले नवीन वाट शोध मोहीम ( वाळंजाई मार्गे )


रानडुक्कराची भेदक नजर.......... तोरणा किल्ले नवीन वाट शोध मोहीम ( वाळंजाई मार्गे ), १० एप्रिल २०१८,

 

उगाचच एका पाठोपाठ एक नवे किल्ले पाहण्यापेक्षा.... आधी पाहिलेले किल्लेच आवडीन वेगवेगळ्या मार्गाने करण आवडत मला. तोरणा किल्ला तसा याधीच १२/१३ वेळा पाहून झाला होता. (आमची आई नेहमी म्हणते “सारखाच काय त्या तोरण्यावर” पण लगेच ती चटणी-भाकरी च्या तयारीला पण लागते.) नेहमीच वेल्हे मार्गे, कधी मेट-पिलावारे मार्गे, तर कधी बालगुड मार्गे, कधी राजगड मार्गे तोरणा सर केलेला होता. यावेळी वाळंजाई मार्गे भट्टी गावात पोहोचणे हे ध्येय होत. वाट तशी अवघड असल्याने आणि चुकण्याची दाट शक्यता (नेहमीची) असल्याने निवडक शिलेदार (नेहमीप्रमाणे कृष्णा, संकेत, आणि नुकताच पदार्पण झालेला आणि दुसराच ट्रेक करणारा अजित) सोबत घेऊन असे 4 जण निघालो.


                                        (on the bike- live selfie)

निघायचं होत रात्री १० वाजता. नेहमीप्रमाणे मनाची वळण घेत घेत ११ ला निघालो. सिंहगड-खानापूर मार्गे पाबे खिंडीतून सर्वात जवळचा मार्ग आहे वेल्हे ला पोहचायला. खानापूर पासून ते पाबे पर्यंत एवढ्या रात्रीच एक हि वाहन नव्हत ( तस वाहन कधी नसतातच....आणि जर असेल तर समजाव ....”रात्रीस खेळ चाले”). पाबे घाटातला चढ पाहून अजित म्हणालाच कि “माझी गाडी कुठल्याच घाटात पहिल्या गिअर वर आली नाही...पण पाबे घाटात पहिल्या गिअर वर आली” (बिचारी गाडी, तिला काय माहित सह्याद्रीच्या घाटवाटा!), संकेत ला नेहमीप्रमाणे डिस्कवर गाडी मिळाली नाही म्हणून स्वारी जाम खुशीत होती. निसर्गाचा एसी चालू झाला होता. रात्रीची थंड हवा आता जास्तच थंड झाली होती. रस्ता निपचित झोपला होता.  

पाबे घाटातून उतरायला चालू केल, आणि पहिल्याच टर्न ला रानडुक्कर हुंकार देत रस्ताच्या बाजूला उभ होत (त्याची एक धडक आणि आम्ही दोघ गाडीसह दरीत.....अस झाल असत जर रानडुक्करान सबुरीन घेतलं नसत तर) आता त्याला अंगावर घेण परवडणार नव्हत, शेवटी तो त्याचा घरी होता, आपणच पाहुणे होतो. पाहुण्यांनी माघार घेतली. जरा जास्तच कानोसा घेत घाट ओलांडला.

एव्हाना रात्रीचे 2 वाजले होते. तोरण्याच्या पायथ्याला गाड्या लावल्या आणि चढण चालू झाली.  तासाभरात नेहमीप्रमाणे मेंगाई देवीच्या मंदिरात पोहोचलो, जोराचा वर सुटला होता. मंदिरात कोणीच नव्हत, आम्ही चौघांनी मस्तपैकी ताणून दिली. सकाळी गडाला छोटीशी प्रदक्षिणा घालून आम्ही हत्ती बुरुजाकडे निघालो. आज फक्त नवीन वाट उतरणे हे पूर्ण दिवसाचे target असल्याने स्वारी जरा निवांतच होती.



 
 हत्ती बुरुज सुद्धा चढून झाला होता. अतिशय घसरण तयार झाली असल्याने शक्योतो वर जाऊ नये. तसही इतिहाच्या पाऊलखुणा असूनही दिसत नाहीत आणि नसूनही आठवणीतून जात नाहीत. हत्ती बुरुजाच्या शेजारून आम्ही वाळंजाई दरवाजाच्या दिशेने पुढ सरकलो. दोन बुरुज पडलेल्या अवस्थेत आहेत, अस वाटत नाही कि इथ दरवाजा असेल, पण इथच आहे ऐतिहासिक दरवाजा. सुरवातीला फुटभर असणारी वाट लगेचच अर्ध्या वितभर शिल्लक राहते, अस वाटत कि आपण हि वाट फसवी तर नाही न? डाव्या बाजूला भयानक दरी, पायाखाली अर्धा वीत असणारी उतरंडीची वाट, आणि त्यातल्या त्यात काळ रात्री चुकून जुना घातलेला बूट....मग काय पाय टिकतच नव्हता, बुटाचा खालचा भाग अक्षरश टक्कल झालेला होता. एक दोन वेळा घसरलो सुद्धा पण सावरलो लगेच. बूट काढण्याची वेळ होती, पण मधेच असल्याने धड काढता येईना आणि ठेवता येईना, कस बस तो टप्पा पार केला, लगेच वाळंजाई मंदिर लागले, शुद्ध पाणी सुद्धा तिथ पाझरून येत होत. तोरणा किल्ल्यावर असणार एकमेव गोड पाणी. गडावर पाणी आहे पण ते तेवढ शुद्ध नाही जेवढ इथल आहे. वाळंजाई मंदिर म्हणजे काय एक दगडाला शेंदूर फसलेला, एक पाळणा ठेवलेला. दोन नारळ, निंबू, मिरच्या (आमच्या नाश्त्याची सोय झाली. दोन्ही नारळ फोडले, मस्त पैकी गोड नारळ खात खात उतरण चालू केली.


                                                                             (या जेवायला....आजचा मेन्यू)

आता उतार होता पण एका डोंगराच्या धारेवरून लहान अशी सरळच उतरण आहे, रस्ता जवळपास नाहीच, सगळी छोटी छोटी दगडच, दगड, घसरून कडेलोट व्यायची शक्यता जाम. म्हणून सोबतील काठी घेतली (नैसर्गिक ब्रेक). उतरण अवघडच वाटत होती, तासाभरात पुन्हा सपाटीसारख्या धारेवर पोहोचलो, मग वळून पाहिलं तर वाट हरवलीच होती. आता थोडा बारा उतार चालू झाला होता. पायवाट मळलेली होती, जायचं होत खाली भट्टी गावात पण मळलेली वाट उजवीकड तोरणा प्रदक्षिणा घालत होती, मळवाट सोडली नाही आणि अर्ध्या तासात भट्टीच्या वरच्या पाड्यात दाखल झालो, दोन चार धनगरांची घर आहेत, वाट विचारली तर कळल कि इथून पण तोरणा ची प्रदक्षिणा घालन शक्य आहे, म्हणजे वेल्हे च्या वाटेला पोह्चन शक्य आहे, आता भट्टी गावात उतरून पुन्हा डांबरी रस्ताने ६ किलोमीटर चालण्यापेक्षा कडेकडेन डोंगर बरे म्हणून निघालो, फसवा रस्ता आणि असंख्य फसव्या ढोरवाटा चाळत निघालो, रस्ता वापरातला नाहीच, चुकून कुठ तरी शेणकुट दिसलं कि बर वाटायचं पण तोरणा चा घेरा अंदाजापेक्षा जास्तच मोठा निघाला, दोन-तीन ओहोळ ओलांडले तरी वाटेचा पत्ता लागत नव्हता, आता रस्ता पूर्ण चुकला होता, दोन फुटापेक्षा कमी उंची खालून काट्याच्या मळ्यात चालत (जवळपास रेंगतच) निघालो, डोक्याला टोपी होती म्हणून थोड वाचत होतो, पण गेल्या जन्माचे वैरी काटे न चुकता टोपीतून आत टोचत होतेच. थोड वर चढाई चालू केली मग रस्ता थोडा दिसला, मग अस वाटल पोहोचलोच पण तो रस्ता एका बिना वापराच्या घराकड चालला होता, तरीही तिकडच गेलो. कारण (कारण नाहीच माहित, उंडरायचं फक्त), पुढ तासाभरात वेल्ह्याच्या वाटेला लागलो, जरा हायसं वाटल.  मग थोड पोहण झाल. दिवस बर्यापिकी डोक्यावर नांदत होता.     


(pose of the day)
(pose of the day2)

                                                                   (pose of the day3 with 2 little frnds)





(हिच तो वाळंजाई देवी.......ज्यावरून किल्ल्याच्या दरवाज्याला नाव पडले होत)



(शरद ऋतू: पानझडी वन.....निसर्गाची कृती...learnt meaning of life)

 



(काळी मैना .... अजून काळी नाही झाली....... किशोरवयीन डोंगरची मैना)



(photo artist: dsp,,,,,innovative )


 



((photo artist: dsp,,,,,innovative2 ))



(sanket dhage touches dhag,,,,,I don’t want any credit of photography)
आपलाच पंकज (भटका................रणझुंझार ट्रेकर्स )
7709159044
pankajamane@gmail.com

1 comment:

  1. छान वर्णन केले आहे 👌🏻👍🏻

    ReplyDelete