Sunday, 9 December 2018

250 ट्रेक पूर्ण झाल्याच्या निमित्ताने....लेखनप्रपंच

250 ट्रेक पूर्ण झाल्याच्या निमित्ताने....लेखनप्रपंच


 



गेल्याच आठवड्यात २५० वा ट्रेक (कमळगड) झाला......थोड मग वळून पाहताना वाटत कि खूप भटकलो...पण अजून मनात इतके ट्रेक भटकायचे आहेत कि त्यासाठी अजून एक जन्म घ्यावा अस वाटतंय..... मला आजही आठवत कि पहिला ट्रेक २००८ मध्ये पुरंदर चा. १० वर्ष झाली, त्यानंतर ट्रेक ची गाडी कधी थांबलीच नाही.....प्रत्येक  महिन्यातला असा रविवार कमीच असेल कि ज्या रविवारी शरीर सह्याद्रीच्या कुशीत विसावा घेत नाही............ महाराष्ट्रातल्या सह्याद्रीत अशी कमीच ठिकाण राहिली असतील जिथ माझी पायगाडी गेली नसेल....
याच खर श्रेय जात माझे आद्यगुरु छत्रपती शिवाजी महाराज यांना.... महाराष्ट्राच्या इतिहासातला हिरा, पुस्तक वाचायची आवड बालपणीच असल्याने महारांजाच चरित्र आपसूकच वाचून काढल. मग कधी माग  वळून पहिलच नाही.... प्रत्येक लेखकाच्या नजरेतून शिवाजी महाराज वेगळ्या angle ने नजरेत पडत होते... शोध चालू झाला होता कि कस होत तेव्हाच वातावरण ...कशी असतील ती  लोक...मग मोडी लिपी शिकून घेतली...जुनी ऐतिहासिक संदर्भ स्वतच्या नजरेतून घातला....पण ते समाधान काही केल्या सापडत नव्हत..... मला वाटत फक्त पुस्तक वाचून छत्रपती समजतात ते अर्धेच... कारण छत्रपती आणि किल्ले एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...... म्हणून सुरवात झाली किल्ले भटकण्याची..........
सुरवातीला दोघ (कृष्णा सोबत)...थोड्या दिवसांनी चौघ....काही महिन्यात ७/८ जण अस करत एक एक किल्ला भटकंती चालू केली होती... तशी खरी सुरवात वाडिया कॉलेज मध्ये गेल्यावर झाली... आम्ही चौघच (विलास, युवराज, निकेश आणि मी) कधीही हिंडायला निघायचो (तस आम्ही चौघ जास्तीच Black and handsome असल्याने कोणतीच पोरगी भाव देत नव्हती आणि आम्ही तिला भाव देण्यासाठी खिशात दमडीसुद्धा नव्हती)..... मला आजही आठवत कि  ट्रेक साठी आपला डब्बा आपण आणायचा... फक्त जायचा यायचा खर्च contri म्हणून काढायचा..(minimum ३० ते maximum  खर्च १७०)....
यानंतर सुरवात झाली ग्रुप ला घेऊन ट्रेक करायचा कारण आम्ही केलेला ट्रेक पाहून इतरही मुल पुन्हा जायचा आग्रह करू लागली.....सुरवात झाली प्रबळगड ची...१७ जण होतो. मला वाटत त्या ट्रेक ची आठवण अजून १७ च्या १७ जण मरेपर्यंत विसरणार नाहीत. त्या ट्रेक मध्ये २ जणांची फाटलेली jeans.... दिवसभर चढण.... हिरवगार वातावरण.... मुसळधार धबधबे....श्याम चा पहिला आणि शेवटचा किल्ला... विलास ने सेल्फी चा शोध याच ट्रेक मध्ये लावला होता. (छोट्या mobile मध्ये मागच्या कॅमेराने).

ग्रुप ट्रेक एका बाजूला आणि वैयक्तिक ट्रेक एक बाजूला चालू होते.... कारण ग्रुप ट्रेक ला तयारी खूप लागायची... budget ठरवावं लागायचं...कधी एकट्याने कधी दोघंच भटकायचो..... आतापर्यंत सिंहगड ४६ वेळा पाहून झालाय....पुण्यात आलेल्या प्रत्येक मित्राला सिंहगड दाखवावाच लागतो......मला आठवत कि धनंजय आणि पठारे कॉलेज च्या मित्रांसोबत पहिल्यांदा सिंहगड चढताना ३ तास लागलेलं ते शेवटच गेल्या महिन्यात चढताना २३ मिनटात पोहचलेल...... ४ गावातून/बाजूने हा गड चढून झाला... एकदा चढून-उतरून पुन्हा चढण सुद्धा केलय.... आणि मी एकदा पैज लावलेली कि गाडी आधी गाडीरस्त्याने चढेल कि मी आधी उभ्या चढणाने सिंहगड वर चढेन आणि ४ मिनिट आधी चढून जाऊन शर्यंत जिंकलेले ते क्षण आठवले तरी तरतरून येत ...(मस्ती जिरली अंगातली तेव्हा पहिल्यांदाच..)....
माझा सर्वात आवडता गड म्हणजे गडांचा राजा .....राजगड १७ वेळा (६ बाजूने), तोरणा १५ वेळा(५ बाजूने), राजगड ते तोरणा ६ वेळा.....तोरणा ते रायगड ३ वेळा.....राजगड ते रायगड २ वेळा... सिंहगड ते रायगड ...... हरिश्चंद्रगड ८ वेळा (५ गावातून ६ बाजूने)......कल्याणगड ११ वेळा.......रायरेश्वर ७ वेळा.... प्रतापगड ७ वेळा..... लोणावळा ते भीमाशंकर २ वेळा (७२ किमी चालत एकदा, जवळपास धावत दुसर्यांदा.)... रायरेश्वर ते प्रतापगड (१०२ किमी पायगाडीने)... प्रतापगड ते रसाळगड (८० किमी धावतच).... आणि अस बरेच काही ट्रेक, trail... झाले..... अस पाठीमाग वळून पाहताना आकडेच मोठे वाटतात पण...पण गड किल्ल्यांवर प्रेमच एवढ बसलंय त्याला शब्दांची जुळवाजुळव सुद्धा कमी पडेल.
या सर्व trail मध्ये साथ मिळाली ती मैत्रीची...... कारण मी फक्त म्हणल कि आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे तर,  “कधी जायचं?” एवढच विचारून त्या वेळेला हजर असणारे (कुठ जायचं हा प्रश्न सुद्धा बऱ्याच मित्रांना पडला नव्हता, कारण त्यांना माहित होतच कि यावेळी नक्कीच नवीन किल्ला आणि नवीन काहीतरी surprise असणार) .....कृष्णा सोबत debut (शब्द फिक्के पडतील असा माझा देव), निकेश सोबत अविस्मरणीय ट्रेक(हा माणूस अवलिया आहे.. सफाईदार पणे कडा चढण याला पक्क येत, सक्ख्या भावासारखा भाऊच), धनंजय ने नेहमीच ट्रेक साठी तळमळीने केलेली मदत, तो आला नाही तरी त्याची गाडी, भांडीकुंडी, सामान गडावर येणारच, हा जर आई-आप्पांना एकुलता एक मुलगा नसता तर यान माझ्यापेक्षा जास्त भटकंती केली असती. धीरज एक हूनहुन्नरी charactor, कायम ट्रेक मध्ये कॉमेडी, dance, selfiegraphy, पण एका शब्दावर जीव टाकणारा......संकेत म्हणजे कुठपण चल म्हणल कि अर्ध्या रात्री ट्रेकसाठी घरातून बोलणी खाऊन ट्रेकला येणारा, आमचे मार्केटिंग चे head.. पुढे जाऊन हा देखील महाराजांच्या गड किल्ल्यांचा धंदा करणार नाही असा मावळा.......... एक-एकाचे इथ नाव आणि लक्षण लिहायचे म्हणजे इथ जागा पुरणार नाही, मला माफ करा मित्रानो ज्यांच नाव इथ लिहू शकलो नाही कारण....कुछ लोग दिल मै बसते है, शब्दो मै नाही..... तस पाहिलं तर आई-वडिलांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला, आणि विरोधहि केला नाही म्हणून कदाचित मी एवढा पल्ला गाठला आहे.    
आपण कधी किल्ल्यांचा धंदा केला नाही...(रणझुंजार ट्रेकर्स)
होय, आम्ही कधीच ट्रेक चा धंदा केला नाही, पुण्यात आजच्या घडीला अनेक संस्था आहेत कि ज्या ट्रेक organise करतात त्या फक्त पैशांसाठी, आम्ही जे ट्रेक ३०० रुपयात केले तेच ट्रेक ते १००० रुपये घेतात तेव्हा हळहळ वाटते... बाजारीकरण झालाय आता सगळ्या गोष्टींच. बरीच लोक फक्त फोटो काढण्यासाठी आणि dp ची शोभा वाढवायला ट्रेक करतात, खरेपणा हरवत चालला आहे.
आज पर्यंत १ रुपया सुद्धा profit करून घेतला नाही (तस जर उधारी जर वसूल केली तर लाखभर रुपये तरी आरामात जमा होतील... असो पण माझ्यासाठी पैशापेक्षा माणूस महत्वाचा आहे कारण पैसा येतो आणि जातो... पण माणूस एकदाच येतो...)  कारण यामध्ये भावना आहेत, या मातीत जो गंध आहे तो नव्या पैशांच्या गंधापेक्षा नक्कीच सुगंधित आहे. आमचा मूळ उद्देश आहे कि कमीत कमी खर्चात किल्ले आणि ट्रेल्स लोकांपर्यंत पोहचवणे. तुम्ही सुद्धा येऊ शकता इथ नैतिक बंधन सोडली तर कोणतीही बंधन नाहीत.
तोरणा किल्ल्यावर १०० झाड आम्ही लावली..तोरन्यावरच पाण्याच तळ साफसफाई...  तिकोण्याच्या पायऱ्या बसवण्याच्या कामी श्रमदान...राजगड च्या तळ्यातील गाळ काढण्यात श्रमदान.... सिंहगड कितीतरी वेळा प्लास्टिक मुक्त केला (आपण गड साफ केला पण लोकांची मन साफ नाही करू शकत, इथ सारखाच कचरा).....अस बरच काही.... हे फक्त मैत्रीच्या बळावर करू शकलो म्हणून मी सर्वांचा आभारी आहे.
तस माझ काही कधीच target नव्हत २५० ट्रेकच. कारण आकड्यासाठी हा भटकंतीप्रपंच चालला नाहीच. खरा उद्धेश पुढ जाऊन किल्ल्याचं संवर्धन कारण माझ मी काम समजतो. पण त्यासोबत नवीन किल्ले नवीन प्रदेश....नवीन वाटा शोधणे ...चालूच राहील.
                                                            आपलाच,

                                                       पंकज शकुंतला अनिल माने.
                                                              (भटका)

  

                                                            

1 comment:

  1. Harrah's Philadelphia Casino & Racetrack - JTM Hub
    Harrah's Philadelphia Casino & 경상남도 출장안마 Racetrack is a racino in Philadelphia, PA and 제주 출장안마 owned by Caesars Entertainment, Inc. The casino is located 부산광역 출장안마 in 통영 출장마사지 the 고양 출장샵

    ReplyDelete